इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 25वा सामना मंगळवारी (दि. 18 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याची कामगिरी केली. मुंबईने 14 धावांनी विजय मिळवत विजयाची हॅट्रिक साधली. मुंबईचा विजय कॅमेरून ग्रीन व अर्जुन तेंडुलकर यांचे महत्त्वाचे योगदान राहिले.
Match 25. Mumbai Indians Won by 14 Run(s) https://t.co/azrMhdM0gH #TATAIPL #SRHvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023
हैदराबाद येथे झालेल्या या सामन्यात मुंबईला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मुंबईला रोहित व ईशान या जोडीने 41 धावांची सलामी दिली. दोघांनी अनुक्रमे 28 व 38 ध वांची खेळी केली. त्याचवेळी अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा काहीसा चाचपडताना दिसला. मात्र, तिलक वर्माने 17 चेंडूवर 37 धावा कुटल्या. अखेरीस ग्रीनने आपला दर्जा दाखवत हंगामातील पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने नाबाद 64 धावा केल्या. या सर्वांच्या योगदानामुळे मुंबई संघ 5 बाद 192 अशी मजल मारू शकला.
या धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. मागील सामन्यातील शतकवीर ब्रुक व त्रिपाठी हे केवळ 25 धावांवर माघारी परतले. मयंक अगरवाल व कर्णधार मार्करम यांनी भागीदारी करत संघाला सामन्यात आणले. मात्र, मार्करम व अभिषेक शर्मा लागोपाठ बाद झाल्याने सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संकटात सापडला. मयंकने 44 धावांची खेळी केली. हेन्रिक क्लासेनने 16 चेंडूवर 36 धावा चोपत सामन्यातील रंगत वाढवली. परंतु मुंबईने अखेरच्या काही षटकांमध्ये आणखी घातक गोलंदाजी केली. केवळ दुसरा सामना खेळत असलेल्या अर्जुन तेंडुलकर याने अखेरच्या षटकात केवळ पाच धावा देत 14 धावांनी संघाला विजय मिळवून दिला. मुंबईचा हा सलग तिसरा विजय आहे.
(IPL 2023 Mumbai Indians Beat Sunrisers Hyderabad By 14 Runs Cameron Green Tilak Varma And Arjun Tendulkar Shines)