दोन वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर करणारा संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स होय. कोलकाता संघ आयपीएल 2023 स्पर्धेत संमिश्र कामगिरी करताना दिसत आहे. कोलकाताने आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यात 3 विजय मिळवले आहे, तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. कोलकाताचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर याच्या अनुपस्थितीत नितीश राणा संघाची धुरा सांभाळत आहे. संघाचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल हा या स्पर्धेत खास फॉर्ममध्ये दिसत नाहीये. त्याने 8 सामन्यात आतापर्यंत 18च्या सरासरीने फक्त 108 धावा केल्या आहेत.
दोन हंगामांपासून रसेलची बॅट शांत
मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आंद्र रसेल (Andre Russell) याने पहिल्यांदा चार षटके पूर्ण टाकली. त्यात त्याने 29 धावा खर्च करत 2 विकेट्सची कमाई केली. रसेल मागील अनेक वर्षांपासून कोलकाता संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. 2014मध्ये कोलकाता संघात रसेलने एन्ट्री केली होती. त्यावेळी त्याने विस्फोटक फटकेबाजी करत आपली छाप सोडली होती. 2019च्या हंगामात रसेलने 204.81च्या स्ट्राईक रेटने 510 धावा चोपल्या होत्या. मात्र, मागील काही वर्षांपासून तो गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत आहे.
कोलकाताने केला उपचार
स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना आंद्रे रसेल कोलकाता नाईट रायडर्स (Andre Russell Kolkata Knight Riders) या संघासोबत असलेल्या नात्याविषयी बोलला. रसेल म्हणाला की, “मागील काही वर्षांमध्ये केकेआरने माझ्यासाठी खूप काही केले आहे. ते मला गुडघ्यावर योग्य उपचार घेण्यासाठी पाठवतात. प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर माझ्यासाठी हे खूपच खास आहे. इतर कोणतीही फ्रँचायझी किंवा माझा देश वास्तवात माझ्यावर एवढी गुंतवणूक करत नाही.”
पुढे बोलताना अष्टपैलू म्हणाला की, “मी इथे खुश आहे. मला या स्पर्धेचा भाग बनण्यासाठी इतर कोणताही संघ दिसत नाहीये. कारण, मी इथे जवळपास 9 वर्षांपासून आहे. इतक्या वर्षांपासून इथे आहे, मी या लोकांना भेटतो. प्रत्येक वर्षी त्यांच्या जवळ येतो. जेव्हा क्रिकेट नसते, तेव्हाही मी मिस्टर वेंकी (म्हैसूर) यांच्या संपर्कात आहे.”
आंद्रे रसेल शनिवारी (दि. 29 एप्रिल) ईडन गार्डन्सवर रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स वि. गुजरात टायटन्स सामन्याचा भाग आहे. या सामन्यात तो कशी कामगिरी करतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. (ipl 2023 my country didnt invest that much in me andre russell gets emotional remembering kkr favor read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“धोनी 100 कसोटी खेळू शकला असता पण…”, 9 वर्षांनंतर शास्त्रींचा मोठा खुलासा
हे चार संघ खेळणार प्ले ऑफ्स! दिग्गजाने पूर्वार्धानंतर बांधला अंदाज






