इंडियन प्रीमिअर लीग इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्रावो याचाही समावेश होतो. ब्रावोने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 14 हंगाम खेळले आहेत. तो डेथ ओव्हर म्हणजेच अखेरच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या नावावर आजही आयपीएलमध्ये सर्वाधिक 183 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. ब्रावो त्याच्या गोलंदाजीसाठीच नाही, तर वादळी फलंदाजी करण्यासाठीही ओळखला जातो. आयपीएल 2023मध्ये तो सीएसकेचा गोलंदाजी प्रसिक्षक आहे. नुकतेच त्याने टी20मध्ये अखेरच्या षटकात गोलंदाजी करण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
अखेरच्या षटकात सर्वोत्तम चेंडू कोणता?
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) त्याच्या अचूक यॉर्कर चेंडूसाठी ओळखला जातो. त्याने यॉर्करने डझनभर विकेट्स घेतल्या आहेत. नुकतेच त्याला विचारण्यात आले होते की, अखेरच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी चांगला चेंडू कोणता आहे? यावर तो म्हणाला की, “तो चेंडू नेहमीच यॉर्कर असला पाहिजे. मात्र, ही गोलंदाजी करणे सर्वात कठीण चेंडूंपैकी एक आहे.” त्याच्यानुसार, “तुम्हाला वास्तवात तासंतास सराव करावा लागतो. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट, वाईड गोलंदाजी, सरळ गोलंदाजी असे वेगवेगळे पर्याय मिळतात. त्यासाठी गोलंदाजी स्टॉकमध्ये हा सर्वात महत्त्वाचा चेंडू आहे.”
‘यॉर्करशिवाय दीर्घ टिकणार नाही’
ड्वेन ब्रावो याच्याकडे लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, शाहीन शाह आफ्रिदी आणि मिचेल स्टार्क यांसारखी गती नव्हती. मात्र, तो अचूक गोलंदाजीच्या जोरावर यॉर्कर चेंडू टाकत राहिला. यावेळी ब्रावो म्हणाला की, “हे असे काही आहे, जे तुमच्याकडे टी20 क्रिकेट प्रकारात असले पाहिजे. जर तुमच्याकडे यॉर्कर नसेल, तर तुम्ही दीर्घ काळ टिकणार नाही. जोपर्यंत तुम्ही वास्तवात वेगवान गोलंदाज नसाल, तर टिकू शकणार नाही. त्यामुळे जर तुम्ही 150हून अधिकच्या गतीने गोलंदाजी केली, तर असा एक क्षण येतो, जेव्हा तुम्हाला वास्तवात यॉर्करवर विश्वास ठेवण्याची गरज असते. कारण, हा सर्वात कठीण चेंडू आहे. तसेच, हा सर्वात सुरक्षित पर्यायही आहे. जेव्हाही तुम्ही दबावात असता, खासकरून डावाच्या शेवटी यॉर्कर नेहमीच उपयुक्त चेंडू असतो.”
चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना शनिवारी (दि. 8 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (ipl 2023 pacer dwayne bravo or art of yorkers in t20 format and training csk bowlers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका मैदानात दोन किंग! ईडन गार्डनवर विराट-शाहरुखने केलेला डान्स होतोय व्हायरल
लय भारी! 2018नंतर KKRच्या खास चाहत्याला भेटला शाहरुख, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ