---Advertisement---

MPL 2023 । प्लेऑफमधील शेवटच्या स्थानासाठी ‘असे’ आहे समिकरण! पुणेरी बाप्पाचे पारडे जडच

Puneri Bappa
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 चांगलीच रंगात आली आहे. पुणे स्थित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर लीगचे सर्व सामने आयोजित केले गेले आहेत. गुरुवारी (22 जून) कोल्हापूर टस्कर्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. तर दुसरीकडे छत्रपती संभाजी किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ बनला. पुणेरी बाप्पा संघालाही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी अजून एका विजयाची गरज आहे.

एमपीएल 2023च्या प्लेऑफ्सचे समीकरण लक्षात घेता पहिल्या चारमध्ये सामील होण्यासाठी पुणेरी बाप्पा संघाला अजून एका विजयाची गरज आहे. ईलग नाशिक टायटन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला होता. त्यानंतर यादीत दुसरा क्रमांक लावला रत्नागिरी जेट्स संघाने. तिसऱ्या क्रमांकावर गुरुवारी छत्रपती संभाजी किंग्जचा पराभव केल्यानंतर कोल्हापूर संघाने जागा पक्की केली. पुणेरी बाप्पा संघ देखील गुरुवारी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकत होता. मात्र, हे शक्य झाले नाही.

प्लेऑफमधील चौथे स्थान पटकावण्यासाठी पुणेरी बाप्पा आणि सोलापूर रॉयल्स यांच्यात स्पर्धा असेल. असे असले तरी, पुणेरी बाप्पाचे पारडे काही केल्या जड आहे. कारण पुणे संघाने पहिल्या चार पैकी दोन सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे सोलापूर संघाने पहिल्या चार पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. असात लीग स्टेजचा शेवटचा सामना जरी सोलापूरने जिंकला, तरी संघ पुण्याची बरोबरी साधू शकतो, पण त्यांना मागे टाकू शकत नाही. अशा वेळी प्लेऑफचा निर्णय नेट रन रेटच्या आधारे घेतला जाईल. दुसरीकडे पुणे संघाकडे मात्र, सोलापूरला या स्पर्धेतून बाहेर काढण्याची संधी असेल. पुणेरी बाप्पा आणि लीग स्टेजचा शेवटच्या सामन्यात जिंकला, तर संघ थेड पहिल्या चारमध्ये पोहोचणार आहे.

पुण्याला आपला पुढचा सामना रत्नागिरी जेट्सविरुद्ध शनिवारी (24 जून) दुपारी खेळायचा आहे. तर दुसरीकडे सोलापूर संघ आपला शेवटचा लीग सामना शुक्रवारी (23 जून) सायंकाली छत्रपती संभाजी किंग्जविरुद्ध खेळेल. छत्रपती संभाजी किंग्जने पहिल्या चार पैकी एकही सामना न जिंकल्यामुले त्यांचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. (IPL 2023 playoff equation, Puneri Bappa will get a chance after a win)

महत्वाच्या बातम्या –
‘देव आपल्याला वाचवणार नाही म्हणत,’ धोनीने खेळाडूंना केले प्रोत्साहित; मग काय भारत बनला चॅम्पियन
होप-पूरनने दाखवली कॅरेबियन पॉवर! वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये नोंदवला सलग दुसरा विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---