---Advertisement---

केकेआरच्या विजयाने गुणतालिकेत खळबळ! मुंबईसह ‘हे’ संघ डू ऑर डाय स्थितीत, वाचा सविस्तर

On: मंगळवार, मे 9, 2023 9:24 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 53  वा सामना कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स संघात ईडन गार्डन्सवर सोमवारी (दि. 8 मे) खेळला गेला. अखेरच्य चेंडूवर केकेआरने हा सामना जिंकत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. त्याचबरोबर आता स्पर्धा देखील आणखी खुली झाली असून, अजूनही दहाही संघांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

केकेआरसाठी हा सामना करा अथवा मरा अशा पद्धतीचा होता. या सामन्यात पराभूत झाल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार होते. मात्र, विजय मिळवल्यानंतर त्यांनी थेट पाचव्या स्थानी मजल मारली. सध्या गुणतालिकेचे गणित असे बनले आहे की, कोणताही संघ पुढे मजल मारू शकतो.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1655634314468687872?t=lIemppMQ2H_5PiQauRxy4g&s=19

 

गुजरात टायटन्स हा एकमेव संघ सध्या पात्रतेच्या अगदी जवळ आहे. त्यांचे 16 गुण आहेत. तीन सामन्यात एक विजय मिळवून ते पहिल्या स्थानी आपले अभियान समाप्त करू शकतात. त्यानंतर चेन्नईचे 11 सामन्यात 13 व लखनऊचे 11 सामन्यात 11 गुण आहेत. यानंतर मात्र दहा गुणांवर पाच संघांची गाडी अडकलीये.

राजस्थान व केकेआर 11 सामन्यात 10 गुण घेत अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत. या दोन्ही संघांसाठी परिस्थिती झाली असून एक सामना गमावला तरी ते स्पर्धेतून बाहेर पडतील. अशीच परिस्थिती सातव्या क्रमांकावरील पंजाबची आहे. सहाव्या क्रमांकावरील आरसीबी व आठव्या क्रमांकावरील मुंबईने 10 सामन्यात प्रत्येकी 10 गुण घेतले आहेत. उभय संघांमध्ये मंगळवारी ( 9 मे) सामना होणार असून, विजेता संघ थेट तिसऱ्या स्थानी झेप घेईल. तर पराभव संघाला राजस्थान, केकेआर व पंजाबसारख्या स्थितीत पोहोचवेल.

गुणतालिकेत तळाशी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स यांची देखील परिस्थिती अशीच असून, उर्वरित आपले चारही सामने जिंकणे त्यांना अनिवार्य आहे. या दोन्ही संघांनी 10 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय.

(IPL 2023 Points Table After KKR Win Over Punjab Kings)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कौतुक करावं तेवढं कमीच! KKRचा खेळाडू वेदनेने विव्हळत असताना धवनने केली मदत, व्हिडिओ जिंकेल मन
धवनचा भीमपराक्रम! फिफ्टी मारताच रचले 2 रेकॉर्ड, एका विक्रमात विराटशी बरोबरी; लगेच घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---