गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियमवर बुधवारी (5 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगला. आयपीएल इतिहासात प्रथमच गुवाहाटी येथे सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाब संघाने पहिल्या सामन्यातील लय कायम राखली. दोन्ही सलामीवीरांनी झळकावलेल्या अर्धशतकांनंतर नॅथन एलिसने तिखट मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना विजयापासून रोखले.
Match 8. Punjab Kings Won by 5 Run(s) https://t.co/VX8gnYKD4P #TATAIPL #RRvPBKS #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2023
इतिहासात प्रथमच गुवाहाटी येथे आयपीएल सामना होत असताना प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात सामन्याला गर्दी केली. घरचा संघ म्हणून खेळत असलेल्या राजस्थानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पंजाबच्या सलामीवीरांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. युवा सलामीवीर प्रभसिमरन गिल याने पहिल्या सामन्यातील फलंदाजीप्रमाणेच आक्रमक रूप धारण करत केवळ 34 चेंडूवर 60 धावा चोपल्या. संघाला 10 षटकात 90 धावांची सलामी दिल्यानंतर तो बाद झाला. चौथ्या क्रमांकावरील जितेश शर्मा याने 27 धावा केल्या. दुसरीकडे कर्णधार शिखर धवनने आपल्या कारकिर्दीतील 50 वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 56 चेंडूवर 86 धावांची खेळी केली.
या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने सर्वांच्या अपेक्षे विपरीत यशस्वी जयस्वालसोबत रविचंद्र अश्विन याला फलंदाजीची संधी दिली. मात्र, अश्विन खातेही खोलू शकला नाही. जयस्वाल 11 तर तिसऱ्या क्रमांकावरील बटलरने 19 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसने आक्रमकपणे 25 चेंडूवर 42 धावा केल्या. मात्र, एलिसने संजू व देवदत्त यांना बाद करत सामन्यात रंगत वाढवली. लोकल बॉय रियान परागने 12 चेंडूत 20 धावा केल्या. त्यानंतर सामना पंजाबच्या हातात होता.
मात्र, शिमरन हेटमायर व ध्रुव जुरेलने करन व अर्शदीप यांच्याविरुद्ध षटकार चौकार लगावत सामना रंगतदार बनवला. अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 16 ध वांची गरज होती. मात्र, करनने आपला अनुभव दाखवत पंजाबला विजयीरेषेपार नेले.
(IPL 2023 Punjab Kings Beat Rajasthan Royals By 5 Runs Prabhsimran Dhawan Ellis Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोलंदाजांना शिस्तीत आणण्यासाठी गावसकरांनी सुचविला ‘हा’ उपाय, म्हणाले, “वाईड चेंडू टाकणारे…”
मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध अहमदनगर पेरियार पँथर्सचा सामना बरोबरीत