आयपीएल 2023 मध्ये बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अखेरच्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागला. शेवटच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता असताना संदीप शर्मा याने धोनीला रोखत संघाला 3 धावांनी विजय मिळवून दिला. धोनीने अखेरच्या षटकात दोन षटकार ठोकत सामन्यात रंगत आणली होती.
Match 17. Rajasthan Royals Won by 3 Run(s) https://t.co/MCaswASydi #TATAIPL #CSKvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2023
चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या शतकात यशस्वी जयस्वाल याला बाद करत तुषार देशपांडे याने चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. मात्र, त्यानंतर बटलर व पडिक्कल यांनी धावांचा वेग वाढवत संघाला 80 धावांच्या पार नेले. परंतु, जडेजाने पडिक्कल व संजू यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर बटलर व अश्विन यांनी आणखी एक भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दरम्यान बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले. अश्विनने 31 धावांचे योगदान दिले. अखेर हेटमायरने अखेरच्या टप्प्यात काही आक्रमक फटके खेळले. त्यासह संघाने 175 धावांचा टप्पा पार केला.
धावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड केवळ 8 धावा करून बाद झाला. दुसऱ्या गड्यासाठी अजिंक्य रहाणे व कॉनवे यांनी भागीदारी केली. मात्र, त्यानंतर आलेले फलंदाज धावांची गती वाढवू शकले नाहीत. कॉनवे अर्धशतक करत बाद झाला. चेन्नईला विजयासाठी अखेरच्या तीन षटकात 55 धावांची गरज होती. धोनी व जडेजा या अनुभवी जोडीने या तीन षटकात चांगलीच आक्रमक फलंदाजी केली. अखेरच्या षटकात 21 धावांची गरज असताना धोनीने दोन षटकार खेचले होते. मात्र, अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना धोनी केवळ 1 धाव घेऊ शकला. यासह राजस्थानने गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली.
(IPL 2023 Rajasthan Royals Beat Chennai Super Kings By 3 Runs MS Dhoni Chahal Shines)