आयपीएल 2023 स्पर्धेचा 11वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान राजस्थान रॉयल्सने दिल्लीला एकतर्फी नमवले. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत संघाचा विजय साकारला. राजस्थानचा हा स्पर्धेतील दुसरा विजय असून, आता ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
Match 11. Rajasthan Royals Won by 57 Run(s) https://t.co/FLjLINwRJC #TATAIPL #RRvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
आपले दुसरे होम ग्राउंड असलेल्या गुवाहाटी येथे खेळताना राजस्थानला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचा यशस्वी जयस्वाल व जोस बटलर यांनी पुरेपूर फायदा उचलला. जयस्वालने खलील च्या पहिल्या षटकात पाच चौकार वसूल केले. त्याने आक्रमण करत स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या दहा षटकातच या दोघांनी 98 धावा बनवल्या. जयस्वाल 60 धावा करून माघारी परतल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही खाते खोलू शकला नाही. त्यानंतर बटलरने आक्रमक रूप धारण करत 79 धावांची खेळी केली. हेटमायरने नाबाद 39 धावा करत राजस्थानला 199 पर्यंत मजल मारून दिली.
या धावांचा पाठलाग करताना ट्रेंट बोल्ट याने दिल्लीला पहिल्या षटकात दोन झटके दिले. त्यानंतर अश्विनने रुसोला बाद करत दिल्लीला आणखी अडचणीत टाकले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा धावांची गती राखू शकला नाही. त्याने 55 चेंडूवर 65 धावा केल्या. इतर फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाल्याने राजस्थानने 57 धावांनी मोठा विजय मिळवत, गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले.
(IPL 2023 Rajasthan Royals Beat Delhi Capitals By 57 Runs Buttler Jaiswal Boult Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवख्या जयसवालचा गुवाहाटीत धमाका! पहिल्याच ओव्हरमध्ये केली ‘अशी’ कामगिरी, थेट गेल-वॉर्नरच्या यादीत नाव
विमानात ब्लॉग करायला निघालेल्या चाहरला धोनीने दिलं हाकलून? दोनदा झाली ‘हटाई’, पाहा व्हिडिओ