आयपीएलच्या मैदानात बुधवारी (5 एप्रिल) पंजाब किंग्जने 5 धावांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात नाथने एलीस आणि कर्णधार शिखर धवन यांनी पंजाबसाठी सर्वोत्तम प्रदर्शन केले. पंजाबने हा सामना जिंकला असला, तरी राजस्थानचा ध्व्रुव जुरेल याने पंजाब संघाचा घाम काढला. ध्रुव इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अंतिम षटकांमध्ये फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला होता. मोठ्या संघर्षानंतर ध्रुव आयपीएलमध्ये खेळू शकला आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सने 20 षटकांणध्ये 4 बाद 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानला मात्र 20 षटकांमध्ये 7 बाद 192 धावांपर्यंत मजल मारता आली. नाथन एलिस (Nathan Ellis) याने आपल्या चार षटकात 30 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच पंजाबच्या विजयात कर्णधार शिखर धवन याच्या नाबाद 86 धावांचे योगदान देखील महत्तवाचे राहिले. असे असले तरी, राजस्थान रॉयल्सच्या विजयाच्या आसा शेवटपर्यंत कायम होत्या. याचे कारण ठरला ध्रुव जुरेल (Dhruv Jurel). त्याने अवघ्या 15 चेंडूत 200च्या स्ट्राईक रेटने नाबाद 32 धावा केल्या.
उत्तर प्रदेशचा 22 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल भारताच्या 19 वर्षाखालील संघाचाही भाग राहिला आहे. 2020 मध्ये तो भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा उपकर्णधार होता. ध्रुवचे मुळ वाग आग्रा असून त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःविषयी काही खास गोष्टी सांगितल्या. ध्रुवने क्रिकेट कीट खरेदी करण्यासाठी आपल्या आईला सोन्याचे चैन विकायला लावली होती. पण आज त्याला याविषयी खंत वाटते. तसेच त्याचे वडील भारतीय सेनेत आहेत आणि त्यांनी कारगिल युद्धात भाग घेतला होता.
मुलाखतीत ध्रुव म्हणाला, “मी बॅट आणि कीटसाठी घरच्यांसमोर गट्ट केला होता. मला या गोष्टी मिळाल्या नातीत, तर घर सोडतो, असे मी म्हटलो होतो. पण ही माझी चूक होती, कारण मी वडिलांना ब्लॅकमेल केले होते. आई यामुळे भावूक झाली होती आणि तिने आपली सोन्याची चैन विकून माज्यासाठी कीट खरेदी केले होते. आजही तो प्रसंग आठवला तर वाईट वाटते.” ध्रुवचे वडील भारतीय जवान असून तोदेखील वडिलांप्रमाने देशासाठी सीमेवर लढू इच्छित होता. त्याचे शिक्षण देखील आर्मी स्कूलमध्येच झाले. पण यादरम्यानच त्याच्यात क्रिकेटची आवड निर्माण झाली. येत्या काळात तो आयपीएल गाजवताना दिसू शकतो. (Rajasthan Royals’ Dhruv Jurel’s Story)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड संघासाठी मोठी धक्का! केन विलियम्सन नाही खेळणार आगामी वनडे विश्वचषक
धवनचे विक्रमांचे आणखी एक ‘शिखर’! यापूर्वी केवळ दोन दिग्गजांना जमलाय ‘तो’ कारनामा