---Advertisement---

‘हायवोल्टेज’ सामन्यात राजस्थानने जिंकली नाणेफेक! गुजरातला फलंदाजीचे आमंत्रण, अशा आहेत प्लेईंग इलेव्हन

On: रविवार, एप्रिल 16, 2023 7:04 PM
Hardik-Pandya-Sanju-Samson
---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये रविवारी (16 एप्रिल) दुसरा सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध उपविजेता राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विजेता ठरणारा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचेल.

राजस्थान तालुक्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर, तीन विजयासह गुजरात देखील टॉप तीनमध्ये दिसून येतो. मागील दोन सामने जिंकत विजय रथावर आरूढ असलेल्या राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी राजस्थानने संघात तीन महत्त्वपूर्ण बदल केले. देवदत्त पडिक्कलच्या जागी रियान पराग, कुलदीप सेनच्या जागी ट्रेंट बोल्ट व बेसन होल्डरच्या जागी फिरकीपटू ऍडम झंपा याला संधी दिली गेली.

दुसरीकडे गुजरातने विजय शंकरच्या जागी अभिनव मनोहर याला आपल्या संघात सामील करून घेतले. विजय याला ताप असल्याने बाहेर बसवावे लागले असे हार्दिकने सांगितले.

राजस्थान रॉयल्स-

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ऍडम झंपा, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

गुजरात टायटन्स-

वृद्धिमान साहा, शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल.

(बातमी अपडेट होत आहे)

(IPL 2023 Rajasthan Royals Won Toss And Elected To Bowl First Against Gujarat Titans At Narendra Modi Stadium)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

तो काय म्हणाला? नितीश राणा-ऋतिक शौकीनचा वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय
BIG BREAKING: अखेर 3 वर्षांनंतर सचिनच्या अर्जुनचे आयपीएल पदार्पण! केकेआरविरूद्ध मिळाली प्लेइंग 11 मध्ये संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---