इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या अभियानाचा सुरुवात दिमाखदार अंदाजात केली. बेंगलोरने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एकतर्फी सामन्यात 8 विकेट्सने शानदार विजय साकारला. या सामन्यात विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी मुंबईच्या गोलंदाजांना विकेट घेण्याची संधीच दिली नाही. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी शंभरहून अधिक धावांची भागीदारी झाली. या विजयानंतर फाफ डू प्लेसिस याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी त्याने खास प्रतिक्रियाही दिली.
कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने सामना जिंकल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. तो यावेळी म्हणाला की, पहिल्यांदाच घरच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळण्याचा अनुभव शानदार राहिला. आयपीएल 2023 स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात नाणेफेक गमावत मुंबईने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 171 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाने 16.2 षटकात 2 विकेट्स गमावत 172 धावा केल्या. तसेच, 8 विकेट्सने सामना खिशात घातला.
‘अशाप्रकारे केला जातो धावांचा पाठलाग’
फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने सामना जिंकल्यानंतर मोठे भाष्य केले. सामन्यानंतर तो म्हणाला की, “आमची सुरुवात खूपच चांगली राहिली. मोहम्मद सिराज याने पॉवरप्लेमध्ये आपल्या गोलंदाजीने एक टोन सेट केला होता. आमचे गोलंदाज आमच्या योजनेवर कायम राहिले. शेवटच्या काही षटकात धावा खर्च झाल्या आणि आम्हाला त्यात सुधारणा करावी लागेल. धावांचा पाठलाग करण्याबाबत बोलायचं झालं, तर तुम्हाला हे समजून घ्यायचे असेल की, आव्हानाचा पाठलाग कसा केला जातो, तर ही खेळी पाहून घ्या. घरगुती खेळाडू म्हणून इथे पहिल्यांदा खेळत होतो. हे खूपच शानदार राहिले. विराट कोहलीसोबत फलंदाजी करण्यात मजा आली. त्याच्यात जबरदस्त उर्जा आहे.”
https://twitter.com/RCBTweets/status/1642613279012048896
https://twitter.com/IPL/status/1642593093609492480
सामन्यातील उत्तम खेळी
पहिल्या डावात तिलक वर्मा याने मुंबईला संकटातून बाहेर काढत 46 चेंडूत 84 धावा केल्या आणि दीडशे धावांचा टप्पा पार करण्यात मोलाचे योगदान दिले. संघाची धावसंख्या 171 होऊनच तो नाबाद मैदानाबाहेर गेला. त्यानंतर बेंगलोरकडून फलंदाजी करताना विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस (Virat Kohli And Faf Du Plessis) यांच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 148 धावांची तुफानी भागीदारी रचली. यावेळी डू प्लेसिसने 73 धावा, तर विराटने 49 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. (ipl 2023 rcb captain faf du plessis reacts on his match winning partnership with teammate virat kohli read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईविरुद्धच्या धमाकेदार मॅचविनिंग खेळीनंतर विराटचे मोठे भाष्य; म्हणाला, ‘तब्बल चार वर्षांनी…’
विराट-प्लेसिसच्या आक्रमणात रोहितसेना चारीमुंड्या चीत! मुंबईची पराभवाची 11 वर्षांची परंपरा कायम






