सोमवारी (दि. 17 एप्रिल) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023चा 24वा सामना खेळला गेला. हा सामना चेन्नईने 8 धावांनी जिंकला. मात्र, या सामन्यात चेन्नईच्या डावातील अखेरच्या षटकात विचित्र घटना पाहायला मिळाली. चेन्नईच्या डावादरम्यान हर्षल पटेल अखेरचे षटक टाकण्यासाठी आला होता. मात्र, त्याने फक्त 2 चेंडू टाकल्यानंतर त्याला संपूर्ण षटक टाकण्यापासून रोखले गेले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल याने हे षटक पूर्ण केले.
विसाव्या षटकात टाकले 10 चेंडू
झाले असे की, हर्षल पटेल (Harshal Patel) याने या षटकातील पहिला चेंडू टाकला, ज्यावर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने एक धाव घेतली. मात्र, हर्षलने दुसरा चेंडू मोईन अलीला कमरेच्या वर टाकला. पंचांनी या चेंडूला नो-बॉल करार दिला. यानंतर त्याने हा पुन्हा टाकला, त्यावर एक धाव घेत जडेजा पुन्हा स्ट्राईकवर आला. पुढच्याच चेंडूवर जडेजाने अतिरिक्त धाव घेत मोईन अलीला स्ट्राईक दिली. मात्र, हर्षलने पुढचाही चेंडू वाईड टाकला.
Harshal Patel taken off due to two waist high No Balls in the same over.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 17, 2023
Innings Break!
It was raining boundaries in the first innings as @ChennaiIPL post a mighty total of 226/6!
Another high-scoring thriller on the cards? We will find out soon 😉
Scorecard ▶️ https://t.co/nvoo5Sl96y #TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/DpQbs56QQj
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
यानंतर त्याने दुसरा चेंडू पुन्हा टाकला, तेव्हा त्याने तीच चूक परत केली आणि मोईन अलीला कमरेच्या वर चेंडू टाकला. आता पंचांनी हर्षलला चेंडू टाकण्यापासून रखले. अशाप्रकारे तो 2 चेंडू टाकू शकला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने हे षटक पूर्ण केले. मात्र, त्यानेही यामध्ये एक चेंडू वाईड टाकला. विसाव्या षटकातून एकूण 16 धावा आल्या. यामध्ये एकूण 10 चेंडू टाकण्यात आल्या. त्यातही 2 नो-बॉल आणि दोन वाईडचा समावेश होता. हर्षलचे हे षटक इतके लांब पडले की, चाहतेही हैराण झाले. या सामन्यात हर्षलने 3.2 षटकात 36 धावा देऊन 1 विकेट घेतली. तसेच, ग्लेन मॅक्सवेल याने 2.4 षटकात 28 धावा देऊन 1 विकेट घेतली.
पंचांनी का नाही दिले षटक?
खरं तर, क्रिकेटच्या नियमानुसार, 41.7.1नुसार- “कोणताही चेंडू जो क्रीझवर सरळ उभ्या असलेल्या फलंदाजाच्या कमरेच्या वर जाईल, तो अयोग्य ठरवला जाईल. जेव्हाही असा चेंडू टाकला जाईल, तेव्हा पंच या चेंडूला नो-बॉल देतील.”
नियम 41.7.4नुसार- “त्या डावात एकाच गोलंदाजाने अशाप्रकारे जर दोन खतरनाक चेंडू टाकण्यात आला असतील, तर पंच कर्णधाराला सूचना करून गोलंदाजाला चेंडू टाकण्यापासून रोखेल.” हर्षलने यापूर्वी 2021मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धही एक डावात 2 बीमर (कमरेच्या वर फुलटॉस) चेंडू टाकले होते, पण त्यावेळी त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखण्यात आले नव्हते. कारण, त्याने लेग-स्टंपच्या बाहेर जो पहिला बीमर टाकला, तो फलंदाजासाठी तेवढा खतरनाक नव्हता.
‘खतरनाक’ श्रेणीत असावा चेंडू
इथे लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की, हे पंचांवर अवलंबून आहे की, ते उसळीला फलंदाजासाठी खतरनाक किंवा दुखापतग्रस्त ठरवावे की नाही. सोमवारी (दि. 17 एप्रिल) पंचांनी दोन्ही चेंडूंना ‘खतरनाक’ श्रेणीत ठेवले. त्यामुळे हर्षलला त्याचे षटक पूर्ण टाकता आले नाही.
सिराजच्या नावावर लांब षटक टाकण्याचा विक्रम
आयपीएलमधील सर्वात लांब षटक टाकण्याचा विक्रम मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याच्या नावावर आहे. त्याने या हंगामात 3 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील 19व्या षटकात 5 वाईड चेंडू टाकले होते. अशाप्रकारे त्याला हे षटक पूर्ण करण्यासाठी एकूण 11 चेंडू टाकावे लागले. (ipl 2023 rcb vs csk why pacer harshal patel not allowed to complete over know 2 beamer rule know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023मधून मोठी बातमी! LSG vs CSK सामन्याच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या कारण
धोनीच्या ‘इम्पॅक्ट’ जाळ्यात फसला ‘किंग’ कोहली, पाहून पत्नी अनुष्काही शॉक; व्हिडिओ व्हायरल