आयपीएलच्या मैदानात शनिवारी दुपारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने होते. बेंगलोरच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. आरसीबीला विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांना चांगली सुरुवात दिली, पण नंतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव याचा शिकार बनला.
कुलदीप यादव आयपीएमलध्ये नेहमीच आरसीबीसाठी खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल () याच्यासाठी बाधा ठरला आहे. मॅक्सवेल आयपीएलच्या मोजक्या काही धमाकेदार फलंदाजांपैकी एक मानला जातो. मात्र कुलदीपच्या समोर नेहमीच त्याने गुडघे टेकले आहेत. कुलदीप यादवसमोर त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत चार वेळा फलंदाजी केली आहे आणि चारही वेळी विकेट गमावली. या चार डावांमध्ये मॅक्सवेलने 22 चेंडू खेळले आणि 59 धावा केल्या. या धावा करतना मॅक्सवेलचा स्ट्राईक रेट 268.2, तर सरासरी 14.8 धावांची होती. यादत 3 चौकार आणि 6 षटकार सामील होते.
आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध कुलदीप यादव
डाव – 4
धावा – 59
चेंडू – 22
विकेट – 4
सरासरी – 14.8
स्ट्राईक रेट – 268.2
चौकार/ षटकार – 3/6
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर मॅक्सवेल 14 चेंडूत 24 धावा करून डेविड वॉर्नरच्या हातात विकेट गमावली. तत्पूर्वी विराटने 34 चेंडूत 50, तर डू प्लेसिसने 16 चेंडूत 22 धावा केल्या. कुलदीने या सामन्यात दिल्लीसाठी दोन विकेट्स घेतल्या, त्यादेखील लागोपाठ चेंडूवर. 15व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कुलदीपने मॅक्सवेलची विकेट घेतली. तर दुसऱ्याय चेंडूवर दिनेस कार्तिक याला शून्यावर तंबूत धाडले. आरसीबने या सामन्ययात प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 174 धावा केल्या. (IPL 2023 RCB vs DC Glenn Maxwell again dismissed Kuldeep Yadwal cheaply)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झिरोच झिरो! आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम दिनेश कार्तिकच्या नावे, रोहितला सोडले मागे
IPL 2023 मध्ये विराटचा धुमाका सुरूच, चार पैकी तिसऱ्या सामन्यात ठोकले अर्धशतक