दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ यासाठी आयपीएल 2023चा हंगाम खूपच निराशाजनक ठरला आहे. संघाचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन याने दिल्लीच्या खराब स्थितीसाठी पृथ्वीला जबाबदार ठरवले आहे. विशेष म्हणजे, त्याने हंगामात 7 सामने खेळत फक्त 101 धावा केल्या आहेत. यामध्ये 54 धावा त्याने मागील सामन्यात केल्या होत्या. म्हणजेच त्याने 6 सामन्यात 47 धावा केल्या होत्या.
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या या सुरुवातीपूर्वी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने आशा व्यक्त केली होती की, पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यावर्षी यशस्वी ठरेल. तसेच, संघाला अनेक सामने जिंकून देईल. मात्र, हा प्रतिभावान खेळाडू अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही.
अशात दिल्लीचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन (Shane Watson) याने चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यापूर्वी मोठे विधान केले. तो म्हणाला की, “दिल्ली कॅपिटल्ससाठी या आयपीएल हंगामातील सर्वात निराशाजनक भागांपैकी एक पृथ्वी शॉ राहिला होता. मी नेहमीच पृथ्वीचा मोठा चाहता राहिलो आहे आणि पृथ्वीला फलंदाजी करताना पाहायला आवडते. जशी त्याने धरमशालामध्ये त्या रात्री केले होते, तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो त्याच्या कौशल्याने सर्वोत्तम गोलंदाजीचा सामना करू शकतो.”
वॉटसनने दिल्लीच्या खेळपट्टीवरही उठवले प्रश्न
शेन वॉटसन म्हणाला की, “हे पाहा, प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर दिल्लीतील खेळपट्ट्या खूप चांगल्या नाहीयेत. जर तुमच्या संघासाठी वेगळ्या पद्धतीचा सेटअप आहे, तर ते कदाचित महान आहेत. जर तुमच्याकडे अव्वलस्थानाचे खूप सारे भारतीय फलंदाज आहेत, तर खेळपट्टी संघासाठी अनुकूल असेल. मात्र, ते आमच्या संघाचे संयोजन नाहीये.”
पुढे बोलताना वॉटसन असेही म्हणाला की, “आम्ही तेव्हा पाहिले की, परदेशी फलंदाज आणि पृथ्वी शॉसोबत आमची फलंदाजी लाईन-अप वास्तवात काय असू शकते, जी आमची ताकद आहे. मात्र, दुर्दैवाने जेव्हा आम्ही इथे दिल्लीत आलो, तेव्हा या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते.”
आयपीएल 2023चा 67वा सामना जिंकणे चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खूपच महत्त्वाचे आहे. जर दिल्लीने हा सामना जिंकला, तर चेन्नईच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळू शकतात. (ipl 2023 shane watson blamed prithvi shaw for bad condition of delhi capitals read what he said )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPLमधील वाद थांबेना! एकमेकांना भिडले हेटमायर अन् करन, पंजाब-राजस्थान लाईव्ह मॅचमध्ये मैदानावर पंगा
बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज कर्णधाराचे निधन, क्रिकेटविश्वावर दु:खाचा डोंगर