भारतातील आयपीएल 2023 स्पर्धेचा महासंग्राम शानदार पद्धतीने पार पडताना दिसत आहे. स्पर्धेतील पहिले 8 सामने खेळले गेले आहेत. आता नववा सामना गुरुवारी (दि. 6 एप्रिल) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बेंगलोरने एक सामना जिंकला आहे, तर कोलकाताची स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली आहे. आता ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात आरसीबी संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. अशात भारताचा माजी खेळाडू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्रा याने आरसीबी संघाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
आकाश चोप्राची भविष्यवाणी
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर याबाबत मोठी भविष्यवाणी केली. तो म्हणाला की, “हा सामना बेंगलोर जिंकेल. याचा अर्थ असा की, बेंगलोरसाठी दोनपैकी दोन विजय आणि कोलकातासाठी दोनपैकी दोन पराभव असेल. असे खरंच होणार आहे का? मला माहिती नाही. आम्ही माहिती काढूच, पण मला वाटते की, असे होईल. तसेच, या सामन्याची माझी दुसरी भविष्यवाणी अशी आहे की, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल दोघेही तीन किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतील. तुम्हाला इतर वेगवान गोलंदाजाचं नाव जोडायचे असेल, तर जोडू शकता. मला वाटते की, वेगवान गोलंदाज इथे फिरकीपटूंपेक्षा जास्त यशस्वी ठरतील.”
‘पॉवरप्लेमध्ये 90हून अधिक धावा होतील’
यावेळी आकाश चोप्रा याने सामन्यात फलंदाजांचा दबदबा असेल असा विश्वास व्यक्त केला. त्याच्यानुसार, या सामन्यात पॉवरप्लेच्या षटकांमध्ये 90हून अधिक धावा केल्या जातील. याविषयी तो म्हणाला की, “पॉवरप्लेमध्ये 90 हून अधिक धावा होतील. दोन्ही संघांचे फलंदाज पहिल्या सहा षटकात 105 धावा करू शकतात. सुरुवातीच्या षटकात चांगली फटकेबाजी होण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टीतून जरा अधिक मदत मिळेल. मात्र, चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे येईल.”
बेंगलोर संघाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला होता. आता कोलकाताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही बेंगलोर संघ विजयी कामगिरी करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (ipl 2023 this former cricketer predicted royal challengers bangalore win today Against kolkata knight riders)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संधी असूनही अश्विनकडून पंजाबच्या कर्णधाराला जीवदान, पण कॅमेऱ्यात कैद झाली बटलरची रिऍक्शन; पाहा व्हिडिओ
बटलरसारखा तगडा फलंदाज असतानाही अश्विन ओपनिंगला का आला? समोर आले धक्कादायक कारण