मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी आयपीएल 2023चा हंगाम खास ठरताना दिसत नाहीये. रोहितने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यात फक्त 184 धावा केल्या आहेत, ज्यात तो 2 वेळा शून्यावर बाद झाला आहे. मागील दोन सामन्यात रोहित पंजाब किंग्सविरुद्ध आणि शनिवारी (दि. 6 मे) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रोहित शून्यावर बाद झाला. या खराब कामगिरीनंतर त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. तसेच, त्याला विश्रांतीचा सल्लाही दिला जात आहे. इतकेच नाही, तर नेटकरी त्याला ‘हिटमॅन‘ऐवजी ‘डकमॅन’ म्हणत आहेत.
रोहितचा लाजीरवाणा पराक्रम
चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. यावेळी रोहितने फक्त 3 चेंडू खेळत शून्यावर तंबूचा रस्ता धरला. यानंतर त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. रोहित आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज बनला. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद होताच रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक 16वेळा शून्यावर बाद होणारा अव्वल खेळाडू बनला. त्यामुळे आता त्याची खिल्ली उडवत नेटकरी त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.
एका युजरने ट्वीट शेअर करत लिहिले की, “बॅटमधून कोणतेही योगदान नाही, पण नेतृत्वाचे श्रेय घेऊन जातो.”
-Doesn't contribute with the bat
-Taking full credit in the name of captaincyIt's Rohit Sharma's game plan since 2015 😭 pic.twitter.com/KayvWG48rB
— Sohel. (@SohelVkf) May 6, 2023
दुसऱ्या एका युजरने जेठालालचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “या आयपीएलमध्ये रोहित शर्मा.”
https://twitter.com/desi_bhayo88/status/1654799979976990720
एकाने असेही ट्वीट केले की, “रोहित शर्माची शून्य धावसंख्या प्रत्येक क्रमांकावर.”
Rohit Sharma duckouts at different positions #CSKvMI pic.twitter.com/oBYkTPpYTZ
— tweetakudu (@tweetakudu) May 6, 2023
आणखी एकाने असे ट्वीट केले की, “मागील 11 डावात 4 वेळा शून्यावर बाद, जेव्हा सलामीला खेळला नाही तेव्हा.”
Rohit Sharma has 4 Ducks in Last 11 Innings, When he played as Non-opener in IPL#MIvsCSK
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) May 6, 2023
शून्यावर बाद होण्याविषयी एकाने रोहितला ट्रोल केले. युजरने ट्वीट करत लिहिले की, “आयपीएल इतिहासात सर्वाधिक डक.”
Rohit sharma ♥️ Duck pic.twitter.com/FmApUw7zf1
— Arun Singh (@ArunTuThikHoGya) May 6, 2023
Rohit Sharma with his duck collection pic.twitter.com/XkSkD2c0UI
— Sagar (@sagarcasm) May 6, 2023
एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “ड्रामा नाही, भांडण नाही, आक्रमकत नाही, शिवी नाही, प्रदर्शन नाही, आयपीएलमध्ये डकमॅनच्या नावावर 16 शून्य धावा.”
– No drama
– No fight
– No agression
– No abusive behaviour
– No performance16 Ducks in IPL by the Duckman – Rohit Sharma #CSKvMI pic.twitter.com/0R3YNJHzxo
— Priyanshu (@PriyanshuVK18K) May 6, 2023
आणखी एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “रोहित डक शर्मा.”
Rohit Sharma the OG 🔥🔥 pic.twitter.com/mkjTGnLsFC
— Meera (@legalhash) May 6, 2023
मुंबईचे गुणतालिकेतील स्थान
मुंबईचा हा हंगामातील पाचवा पराभव होता. या पराभवासह मुंबई 10 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. तसेच, चेन्नई संघ विजय मिळवत गुणतालिकेत 13 गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. (ipl 2023 twitter reactions after rohit sharma most ducks ipl history hitman to duckman know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात आरसीबीचा पुन्हा राडा! वॉर्नर आणि सॉल्टशी भिडला सिराज
50- 50 आणि 50! विराटने जुळवला ‘हा’ अनोखा योगायोग, वाचून तुम्हीही कराल कौतुक