दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल 2023च्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला. हंगामातील आपल्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ देखील अपयशी ठरला. शॉने हंगामातील पहिल्या सामन्यात 12, तर मंगळवारी (4 एप्रिल) खेळलेल्या दुसऱ्या सामन्यात 7 धावा करून विकेट गमावली. त्याच्या या सुमार खेळीचा परिणाम संघावर देखील दिसला. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी दिग्गज विरेंद्र सेहवाग याने शॉला चांगलेच सुनावले. सेहवागने यावेळी शुबमन गिल याच्याकडून शिकण्याचा सल्लाही शॉला दिला.
दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स (DC vs GT) यांच्यात मंगळवारी (4 एप्रिल) आयपीएल 2023चा सातवा सामना खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अवघे 5 चेंडू खेळला आणि 7 धावा करून बाद झाला. दुसरीकडे गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुबमन गिल (Shabuman Gill) मात्र जबरदस्त प्रदर्शन करत आहे. आपल्या दमदार खेळीच्या जोरावर गिलने भारतीय संघातील जागाही पक्की केली आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात शॉ पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर दिल्लीचा माजी कर्णधार विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) चांगलाच संतापला.
पृथ्वी शॉला आयपीएलमध्ये धावा कराव्याच लागतील – विरेंद्र सेहवाग
सेहवाग म्हणाला की, “पृथ्वी शॉ अनेकदा असे शॉट्स खेळताना बाद झाला आहे. पण त्याने आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. शुबमन गिलकडे पाहा. त्यांनी 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये एकत्र सुरुवात केली होती. गिल सध्या कसोटी, वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा भाग आहे. पण शॉ मात्र अजूनही आयपीएलमध्येच संघर्ष करतोय. त्याला आयपीएलमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्याच लागतील. ऋतुराज गायकवाडने 600 धावा केल्या होत्या. शुबमन गिलनेही धावा केल्या आहेत. त्यामुळे शॉला देखील धावा कराव्या लागतील.”
(IPL 2023 । Virender Sehwag is furious with Prithvi Shaw for his poor innings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलला का नाही मिळाली गोलंदाजी? कर्णधार डेविड वॉर्नरन सांगितले कारण
जोस मनानेही ‘बॉस’! युवा भारतीय फलंदाजाला दिले षटकार मारण्याचे धडे, पाहा चर्चेतील व्हिडिओ