चार वेळा इंडियन प्रीमिअर लीगचा किताब जिंकणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स होय. चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याला चाहत्यांकडून आयपीएल 2023 स्पर्धेत तुफान पाठिंबा मिळत आहे. विशेष म्हणजे, धोनीला फक्त होम ग्राऊंड चेन्नईमध्येच नाही, तर तो जिथे जातोय, तिथे त्याला भरपूर पाठिंबा मिळत आहे. धोनीला एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत असलेला पाठिंबा पाहून राजस्थान रॉयल्स संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयसवाल याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जयसवालच्या मते, धोनीला विरोधी संघ आणि त्यांना पाठिंबा देणारे चाहतेही खूप पसंत करतात.
भारताला आयसीसीच्या 3 ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने सन 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यानंतर तो सातत्याने आयपीएल (IPL) खेळताना दिसत आहे. यानंतर तो या स्पर्धेचाही निरोप घेणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती धोनी किंवा संघ व्यवस्थापनाकडून आली नाहीये. मात्र, धोनीने आयपीएल 2022मध्ये खेळले होते की, त्याला त्याचा शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळायला आवडेल. त्यामुळे सर्वांना असे वाटत आहे की, धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. त्यामुळे त्याला संपूर्ण भारतभरातून पाठिंबा मिळत आहे.
‘एमएस धोनीला विरोधी संघही पसंत करतात’
चेन्नईविरुद्ध भिडण्यापूर्वी यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याला चेन्नईला मिळत असलेल्या पाठिंब्याविषयी विचारण्यात आले. यावेळी उत्तर देताना तो म्हणाला की, “मी समजू शकतो की, धोनीबाबत चाहत्यांची काय भावना आहे. त्यांना विरोधी संघ आणि त्यांचे चाहतेही पसंत करतात. मीदेखील त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मात्र, या सामन्यात आम्हाला आमच्या कामगिरीवर लक्ष द्यावे लागेल. मागील सामन्यात जयपूर येथे आम्हाला खूप पाठिंबा मिळाला होता. आशा आहे की, यावेळी धोनी मैदानात असूनही तसेच होईल.”
आयपीएल 2023चा 37वा सामना गुरुवारी (दि. 27 एप्रिल) राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर पार पडणार आहे. (ipl 2023 youngster yashasvi jaiswal reacts on tremendous crowd support for legend ms dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC T20 Rankings: ‘टॉपर’ सूर्यकुमारच्या जागेला धोका, ‘या’ पाकिस्तानी खेळाडूची दुसऱ्या स्थानी झेप
मोठी बातमी! WTC फायनलमध्ये कोरोनाची चिंता मिटली, पॉझिटिव्ह असूनही खेळू शकणार खेळाडू?