तामिळनाडूचा अष्टपैलू शाहरुख खान याने आयपीएल 2024साठी गुजरात टायटन्स संघात नाव सामील केले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी मंगळवारी (19 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव पार पडला. मागच्या वर्षी शाहरुख पंजाब किंग्जचा भाग होता. पुढच्या हंगामासाठी शाहरुखला पुन्हा खरेदी करण्याचा प्रयत्न पंजाबकडून झाला, पण अष्टपैलू खेळाडू त्यांच्या हाती आला नाही.
आयपीएल 2024 पूर्वी सर्व फ्रँचायझींनी आपल्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. शाहरुख खान याच्यासाठी पंजाब किंग्जने मागच्या हंगामात 9 कोटी रुपये खर्च केले होते. लिलावात शाहरुखला कमी किमतीत खरेदी करण्याच्या विचारत पंजाब किंग्ज संघ होता. मात्र, प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाहीत. शाहरुखची किंमत या लिलिवात 9 कोटींपेक्षा कमी झाली. पण पुजाबच्या हाताला तो लागला नाही. गुजरात टायटन्सने अष्टपैलू खेळाडूला खरेदी करण्यासाठी 7.4 कोटी रुपये खर्च केले. पंजाब आणि गुजरात फ्रँचायझी शाहरुखसाठी आमने सामने आल्या होत्या. पण अखेर गुजरातने बाजी मारली.
SOLD for INR 7.40 Crore! 💰
Shahrukh Khan will play for the Gujarat Titans 🙌#IPLAuction | #IPL
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
आयपीएलमध्ये शाहरुखने पंजाब किंग्जसाठी 33 सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने मागच्या आयपीएल हंगामा 160+ स्ट्राईक रेटने धावा केल्या. पण प्रदर्शनात सातत्य राखण्यासाठी अष्टपैलू झगडताना दिसला होता. यावर्षी तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये शाहरुखने सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या आगामी हंगामात शाहरुख खान याचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल. चाहते आणि जाणकार त्याच्या प्रदर्शनावर नजर ठेऊन असतील. (IPL 2024 Auction । Shahrukh Khan sold to Gujarat Titans at 7.40cr.)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 Auction: वर्ल्डकपमध्ये कहर करणारा घातक वेगवान गोलंदाज ‘पलटण’च्या ताफ्यात, केवढे कोटी केले खर्च?
IPL Auction । वर्ल्डकपमध्ये नडलेला ‘हा’ खेळाडू आता रोहितसोबतच खेळणार; वेगवान गोलंदाजासाठी मुंबईचा मोठा खर्च