IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीगचा 17वा हंगाम आता काही महिन्यांवर आला आहे. त्यापूर्वी 19 डिसेंबर रोजी दुबईत आयपीएल 2024 लिलाव होणार आहे. आयपीएलने यावेळी लिलावासाठी 333 खेळाडूंची नावे निवडली आहेत. यातील 214 भारतीय, तर 119 खेळाडू परदेशी आहेत. यावेळी लिलावात चाहत्यांना असे काही पाहायला मिळणार आहे, जे मागील 16 हंगामात एकदाही घडले नाहीये.
आयपीएल 2024 लिलावापूर्वी मोठा निर्णय
आतापर्यंत आयपीएल लिलावात (IPL Auction) परदेशी ऑक्शनर खेळाडूंची बोली लावण्याचे काम करत होते, पण यावेळी एका भारतीयाला ही जबाबदारी मिळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) या ऑक्शनरच्या नावाची पुष्टी केली आहे. खास बाब अशी की, यावेळी ऑक्शनर एक महिला आहे. आयपीएलच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखादी महिला ऑक्शनर खेळाडूंचा लिलाव करेल.
कोण आहे ती ऑक्शनर?
माध्यमांतील वृत्तांनुसार, आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावात मल्लिका सागर (Mallika Sagar) बोली लावेल. मल्लिका सागर मुंबईची रहिवासी असून तिने यापूर्वीही ऑक्शनरची भूमिका पार पाडली आहे. मल्लिकाने महिला प्रीमिअर लीग 2023मध्येही 2 वेळा यशस्वीरीत्या सर्व खेळाडूंचा लिलाव केला होता. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने फ्रँचायझींना सांगितले आहे की, एक स्वतंत्र व्यावसायिक ऑक्शनर मल्लिका सागर लिलावाचे संचालन करेल. तसेच, ती लिलावातील सर्व पैलूंसाठी एकमेव मध्यस्थ असेल.
आयपीएलमध्ये आतापर्यंत ‘या’ ऑक्शनर्सना मिळाली संधी
आयपीएलची सुरुवात 2008मध्ये झाली होती. आतापर्यंत या स्पर्धेचे 16 हंगाम खेळले गेले आहेत. या लीगमध्ये आतापर्यंत 2 ऑक्शनर्सनाच लिलाव करण्याची संधी मिळाली आहे. पहिले रिचर्ड मॅडली आणि दुसरे ह्यूज एडमीड्स (Hugh Edmeades) होय. आयपीएलच्या पहिल्या 10 वर्षात रिचर्ड मॅडली लिलावाचे आयोजन करत होते. त्यानंतर ह्यूज एडमीड्स यांनी ही भूमिका पार पाडली होती. तसेच, आयपीएल 2022च्या मेगा लिलावादरम्यान एडमीड्स यांची तब्येत बिघडली होती, ज्यानंतर चारू शर्मा यांनी त्या दिवशीच्या लिलावाची जबाबदारी पार पाडली होती. (ipl 2024 auction bcci confirmed mallika sagar will conduct auction in dubai know here)
हेही वाचा-
लाजीरवाणा पराभव होताच आफ्रिकन कर्णधाराचे मोठे विधान; म्हणाला, ‘भारताच्या गोलंदाजांना…’
SAvsIND: पहिल्याच वनडेत आफ्रिकेची धूळधाण उडवल्यानंतर कर्णधार राहुलचे लक्षवेधी भाष्य; म्हणाला…






