आयपीएलच्या या हंगामात चौकार-षटकारांचा पाऊस पडतोय. सोबतच धावांचे अनेक रेकॉर्डही बनत आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर याच हंगामात बनला. या हंगामात असे 8 फलंदाज आहेत, ज्यांचा स्ट्राईक रेट 200 पेक्षा जास्त आहे. आश्चर्याचं म्हणजे, या आठपैकी फक्त 2 फलंदाज विदेशी आहेत. म्हणजेच, यंदा पॉवर हिटिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. चला तर मग जाणून घेऊया या हंगामातील अशा फलंदाजांबद्दल, ज्याचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त आहे.
रोमॅरिओ शेफर्ड – मुंबई इंडियन्सच्या रोमॅरिओ शेफर्डनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले, ज्यापैकी 4 सामन्यांमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली. या 4 डावांमध्ये त्यानं 280 च्या स्ट्राइक रेटनं 56 धावा ठोकल्या आहेत.
महेंद्रसिंह धोनी – महेंद्रसिंह धोनीनं आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. यापैकी त्यानं 5 सामन्यांमध्ये फलंदाजी केली. या दरम्यान धोनीनं 255.88 च्या स्ट्राइक रेटनं 87 धावा केल्या आहेत.
अब्दुल समद – सनरायझर्स हैदराबादच्या अब्दुल समदनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 6 सामने खेळले. यापैकी 4 सामन्यांमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये त्यानं 225.53 च्या स्ट्राइक रेटनं 106 धावा केल्या आहेत.
महिपाल लोमरोर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिपाल लोमरोरनं आतापर्यंत 4 सामने खेळले. त्याला या चारही सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये त्यानं 209.09 च्या स्ट्राइक रेटनं 69 धावा बनवल्या आहेत.
दिनेश कार्तिक – आरसीबीचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकनं आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. यापैकी 6 सामन्यांमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये त्यानं 205.45 च्या स्ट्राइक रेटनं 226 धावा केल्या आहेत.
आशुतोष शर्मा – आशुतोष शर्मा या आयपीएलमध्ये सरप्राईज पॅकेज म्हणून समोर आला. पंजाबच्या या आक्रमक फलंदाजानं चार डावांमध्ये 205.26 च्या स्ट्राइक रेटनं 156 धावा बनवल्या आहेत.
आंद्रे रसेल – केकेआरच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूनं आतापर्यंत 6 सामन्याच्या 4 डावांमध्ये फलंदाजी केली. यामध्ये त्यानं 200 च्या स्ट्राइक रेटनं 128 धावा केल्या आहेत.
नमन धीर – मुंबई इंडियन्सच्या नमन धीरनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 3 सामने खेळले. या तिन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्यानं 200 च्या स्ट्राइक रेटनं 50 धावा ठोकल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
केएल राहुलनं अर्धशतक ठोकताच मोडला धोनीचा मोठा विक्रम, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच विकेटकीपर
टिम डेव्हिड-कायरन पोलार्डला आयपीएलनं ठोठावला दंड, कोणत्या चुकीची मिळाली एवढी मोठी शिक्षा?
राहुल-डी कॉकनं मोडला स्वतःचाच विक्रम, भागीदारीच्या बाबतीत वॉर्नर-धवनला टाकलं मागे