चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे सध्या चर्चेत आहे. आरसीबीविरुद्ध आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात त्यानं महत्त्वाच्या वेळी उपयोगी खेळू खेळून संघाला विजय मिळवून दिला. दुबेनं 28 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या. एक वेळी अशी आली होती, जेव्हा चेन्नईनं 110 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. मात्र दुबेनं रवींद्र जडेजा 25 (17) सोबत मिळून नाबाद 66 धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला.
शिवम दुबेच्या बॅटिंग स्टाईलबद्दल सर्वांना माहिती आहे, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. आज आपण शिवम दुबेच्या लव्ह लाइफबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, शिवम दुबेची लव्हस्टोरी ही कोणत्याही बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. सुमारे 3 वर्षांपूर्वी झालेल्या त्याच्या लग्नाची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.
शिवम दुबेच्या पत्नीचं नाव अंजुम खान आहे. ती धर्मानं मुस्लिम, तर शिवम हिंदू आहे. हे दोघं एकमेकांना बराच काळ डेट करत होते. यानंतर दोघांनी 2021 मध्ये लग्न केलं. या दोघांनी हिंदू रितीरिवाजांशिवाय मुस्लिम रितीरिवाजांनुसारही लग्न केलं. शिवम आणि अंजुम खान वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे लग्नानंतर त्यानं सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं. मात्र, दोघांच्याही कुटुंबीयांना यावर कोणताही आक्षेप नव्हता.
अंजुम खान हिनं अलीगड मुस्लिम विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. तिनं अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून ललित कला शाखेत पदवी प्राप्त केली. याशिवाय अंजुम हिंदी मालिका आणि संगीत अल्बममध्येही दिसली आहे. ती सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. अंजुम खान सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिनं शिवम सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत .
अंजुम खान आपल्या पतीला चिअर करण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये आली आहे. तसेच तिनं आयपीएलच्या सामन्यांमध्येही हजेरी लावली आहे. लग्नाच्या सुमारे एक वर्षानंतर हे कपल आई-वडील झाले. या दोघांनाही फेब्रुवारी 2022 मध्ये पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या पहिल्या सामन्यातच राडा! विराट कोहलीची रचिन रवींद्रला जाहीर शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल
शाळेत मैत्री अन् पुढे प्रेमात रुपांतर! जाणून घ्या ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूरची लव्हस्टोरी
कोण आहे ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार? क्रिकेटमध्ये कमावलंय मोठं नाव