आयपीएल 2024 चा सलामीचा सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईनं आरसीबीचा 6 गडी राखून सहज पराभव केला. सामन्यात बंगळुरूचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीची बॅट शांत राहिली. त्याला 19 चेंडूत केवळ 21 धावा करता आल्या.
आयपीएलमध्ये दरवर्षी एकापेक्षा एक वाद पाहायला मिळतात. खेळाडूंमध्ये जोरदार वादावादी आणि संघर्ष होत असतो. यंदा हंगामाच्या पहिल्याच सामन्यात अशाप्रकारची बाचाबाची आणि विवाद पाहायला मिळाला. विराट कोहलीनं न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रसाठी जाहीरपणे अपशब्द वापरले.
युवा स्टार खेळाडू रचिन रवींद्रनं आरसीबीविरुद्ध आयपीएल पदार्पण केलं. त्यानं पहिल्याच सामन्यात आपली छाप सोडली. त्यानं अवघ्या 15 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 37 धावा ठोकल्या. त्याला भारताचा अनुभवी लेगस्पिनर कर्ण शर्मानं पायचीत केलं.
रचिन रवींद्र बाद झाल्यानंतर सीमारेषेवर उभ्या असलेल्या विराट कोहलीनं आक्रमकपणे आनंद साजरा केला. त्यानं सीमारेषेवरून रचिन रवींद्रला डगआऊटमध्ये जाण्याचा इशारा केला. विराट ज्या पद्धतीनं बोलत होता, त्यावरून त्यानं अपशब्दही वापरल्याचं दिसत होतं. विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
— Bangladesh vs Sri Lanka (@Hanji_CricDekho) March 22, 2024
गेल्या 16 वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्जला एकाही सामन्यात हरवलेलं नाही. 2008 मध्ये बेंगळुरूनं चेपॉकमध्ये चेन्नईचा शेवटचा पराभव केला होता. तेव्हापासून ते सातत्यानं या मैदानावर अपयशी ठरत आहेत.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं चेन्नईसमोर 174 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, जे सीएसकेनं 18.4 षटकांत 6 गडी राखून गाठलं. आरसीबीकडून अनुज रावतनं 25 चेंडूत सर्वाधिक 48 धावा ठोकल्या. तर दिनेश कार्तिक आणि कर्णधार डू प्लेसिसनं अनुक्रमे 38 आणि 35 धावांचं योगदान दिलं. विराट कोहली 20 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. चेन्नईकडून मुस्तफिजूरनं 29 धावा देत 4 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेच्या सर्वच खेळाडूंनी चांगली सुरुवात केली. मात्र त्यापैकी एकही खेळाडू मोठी खेळी खेळू शकली नाही. अखेरीस शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईनं 6 विकेट्सनं विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिककडून निवृत्तीचे संकेत, CSK vs RCB सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य