Hardik Pandya MI: आयपीएल 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने सोमवारी (दि. 27 नोव्हेंबर) मोठा निर्णय घेतला. त्याने मुंबई इंडियन्स या आपल्या जुन्या संघात पुनरागमन केले. हार्दिकच्या या निर्णयाविषयी गुजरात टायटन्स संघाचे संचालक विक्रम सोलंकी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही हार्दिकची इच्छा होती आणि आम्ही त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो.
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या पहिल्या हंगामात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला आपल्या संघात सामील करत कर्णधार बनवले होते. अष्टपैलू पंड्याने संघाला पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकून दिली होती. विशेष म्हणजे, त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातही गुजरातने अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला होता. मात्र, आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत.
हार्दिक पंड्यासाठी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सशी केलेल्या ट्रेडची बातमी मागील काही दिवसांपासून चर्चेत होती. तसेच, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. तसेच, गुजरातने 26 नोव्हेंबरला त्याला रिटेन केल्याचीही घोषणा केली. त्यावेळी सर्वांना वाटले की, ही बातमी फक्त एक अफवा होती, पण सोमवारी आयपीएलकडून घोषणा झाली की, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स (Hardik Pandya Mumbai Indians) संघात जात आहे.
काय म्हणाले विक्रम सोलंकी?
गुजरात टायटन्स संचालक विक्रम सोलंकी (Gujarat Titans Director Vikram Solanki) यांनी हार्दिक पंड्या याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी सांगितले की, पंड्याने फ्रँचायझी सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला, “गुजरात टायटन्सच्या पहिल्या कर्णधाराच्या रूपात हार्दिक पंड्याने फ्रँचायझीला दोन शानदार हंगाम देण्यात मदत केली आहे, त्यातील एका हंगामाचा किताब जिंकला आणि एका हंगामात अंतिम सामन्यात धडक दिली. त्याने आता आपला पदार्पणाचा संघ मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो आणि त्याला भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो.”
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1729088160666439945
शुबमन गिल कर्णधार
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात गेल्यामुळे गुजरात टायटन्स संघाचे कर्णधारपद रिकामे होते. अशात त्यांनी युवा विस्फोटक फलंदाज शुबमन गिल याला संघाचा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला. शुबमन संघाच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आयपीएल 2023 हंगामात 890 धावांचा पाऊस पाडला होता. (ipl 2024 gujarat titans director vikram solanki reveals hardik pandya expressed his desire to head back to mi)
हेही वाचा-
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसी देणार दणका? चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद धोक्यात
IPL 2024: गुजरात टायटन्सचा कर्णधार बनताच शुबमन गिलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘इतक्या चांगल्या…’






