चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊच्या केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी शानदार फलंदाजी केली. या दोघांनी शुक्रवारी (19 एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यात शतकी भागीदारी रचली. यासह त्यांनी आपलाच एक रेकॉर्ड मोडला आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 8 गडी राखून सहज पराभव केला. लखनऊसाठी राहुलनं 53 चेंडूत 82 तर डी कॉकनं 43 चेंडूत 54 धावांची खेळी खेळली.
चेन्नईनं दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊकडून राहुल आणि डी कॉक सलामीला उतरले. या दोघांमध्ये 90 चेंडूत 134 धावांची भागीदारी झाली. चेन्नई विरुद्ध सलामीला सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसनच्या नावे आहे. या दोघांनी 2015 मध्ये राजस्थानसाठी खेळताना 144 धावांची भागीदारी केली होती. आता या लिस्टमध्ये राहुल-डी कॉक तिसऱ्या स्थानी पोहचले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ आहेत. त्यांनी 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना 138 धावांची भागीदारी रचली होती.
राहुल-डी कॉकनं चेन्नई विरुद्ध सर्वात मोठी सलामी भागीदारीच्या बाबतीत धवन-वॉर्नरच्या जोडीला मागे टाकलं आहे. शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 2014 मध्ये हैदराबादकडून खेळताना 116 धावांची भागिदारी केली होती.
आयपीएल 2024 च्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर, लखनऊ सुपर जायंट्स सध्या पाचव्या स्थानी आहे. त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यापैकी 4 सामन्यात विजय मिळवला असून 3 सामन्यात त्यांचा पराभव झालायं. लखनऊचा राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पराभव झाला आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वात मोठी सलामी भागीदारी –
144 – अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन (राजस्थान रॉयल्स), अहमदाबाद, 2015
138 – शिखर धवन आणि पृथ्वी शॉ (दिल्ली कॅपिटल्स), मुंबई, 2021
134 – केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक (लखनऊ सुपर जायंट्स), लखनऊ, 2024
127 – ग्रॅम स्मिथ आणि स्वप्नील अस्नोडकर (राजस्थान रॉयल्स), चेन्नई, 2008
116* – क्विंटन डी कॉक आणि ईशान किशन (मुंबई इंडियन्स), शारजाह, 2020
116 – डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन (सनरायझर्स हैदराबाद), रांची, 2014
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2024 मध्ये ‘थाला’ अजूनही नाबादच! 255 च्या स्ट्राईक रेटनं करतोय गोलंदाजांची धुलाई
लखनऊचा चेन्नईवर 8 गडी राखून सहज विजय, राहुल-डी कॉकच्या फटकेबाजीसमोर सीएसकेचे गोलंदाज पूर्णपणे फेल
चेन्नईसाठी तारणहार बनून आला रवींद्र जडेजा! मोक्याच्या क्षणी अर्धशतक ठोकून केलं तलवारबाजीचं सेलिब्रेशन