आयपीएल 2024 च्या 36व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स समोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हा सामना खेळला जातोय. आरसीबीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस – आम्ही धावांचा पाठलाग करू. या मैदानावर पाठलाग करणं चांगलं आहे. फलंदाजी इतकी मजबूत आहे की सामान्य धावसंख्या चांगली मानली जात नाही. आमच्या संघात तीन बदल आहेत – ग्रीन, सिराज आणि कर्ण शर्मा टीममध्ये आले आहेत.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर – विकेट कशी खेळते हे आम्हाला माहित आहे, आम्हाला गोलंदाजी करायला आवडलं असते. आम्ही गोष्टी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज
गुणतालिकेत आरसीबी शेवटच्या स्थानावर आहे. त्यांना 7 सामन्यांमध्ये केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे. आजच्या सामन्यात संघाला पुन्हा एकदा स्टार फलंदाज विराट कोहलीकडून धावांची अपेक्षा असेल. ईडन गार्डन हे कोहलीचं आवडतं मैदान आहे. येथे त्यानं अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. अशा स्थितीत कोहली संघाला पुन्हा विजयी मार्गावर आणेल, अशी आशा बेंगळुरू संघाला असेल.
दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी खेळलेल्या 6 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केलाय. गेल्या सामन्यात त्यांचा राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव झाला होता. या हंगामात या दोन संघांमध्ये बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात केकेआरनं शानदार विजय नोंदवला होता. आजच्या सामन्यात गौतम गंभीरचा संघ त्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
नटराजनची घातक गोलंदाजी, हैदराबादनं नोंदवला सलग चौथा विजय; घरच्या मैदानावर दिल्लीचा लाजिरवाणा पराभव
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 250 पेक्षा अधिक धावा करणारा संघ, हैदराबादनं मोडला आरसीबीचा रेकॉर्ड