---Advertisement---

कोलकाताच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचा संघ ढेपाळला, ट्रॉफी जिंकण्यासाठी केकेआरपुढे अवघ्या 114 धावांचं आव्हान

On: रविवार, मे 26, 2024 9:13 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात आज (26 मे) कोलकाता नाईट रायडर्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकांत सर्वबाद 113 धावा केल्या. आता कोलकातासमोर विजयासाठी 114 धावांचं आव्हान आहे.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची सुरुवाच खूपच खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात बोल्ड झाला. स्टार्कनं त्याची विकेट घेतली. त्यानं 5 चेंडूत 2 धावा केल्या. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड पहिल्याच चेंडूवर बाद झाला. वैभव अरोरानं त्याची विकेट घेतली. राहुल त्रिपाठी 9 आणि एडन मार्करम 20 धावा करून तंबूत परतले.

बर्थडे बॉय नितीश रेड्डी काही कमाल करू शकला नाही. तो 13 धावा करून बाद झाला. भरवश्याचा फलंदाज क्लासेननं 17 चेंडूत 16 धावा केल्या. शाहबाज अहमद 8 आणि इम्पॅक्ट प्लेअर अब्दुल समदनं 4 धावा केल्या. कोलकाताकडून आंद्रे रसलनं 3 आणि स्टार्क व हर्षित राणानं 2-2 विकेट घेतल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 

सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर

कोलकाता नाईट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफाईन रदरफोर्ड

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू! आयपीएल फायनलमध्ये मिचेल स्टार्कचा कहर, हैदराबादचे फलंदाज थयथय नाचले

डेक्कन चार्जर्स हैदराबाद आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात काही संबंध, की दोन्ही वेगवेगळे? A ते Z इतिहास जाणून घ्या

आयपीएलच्या 7 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ दोन दिग्गजांशिवाय खेळला जातोय आयपीएल फायनल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---