इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी लखनऊ सुपर जायंट्स संघाने आपल्यासोबत दिग्गजाला सामील केले आहे. एमएसके प्रसाद भारतीय संघाचे माजी प्रमुख निवडकर्ते राहिले आहेत. आयपीएल 2024 मध्ये प्रसाद लखनऊ सुपर जायंट्ससाठी धोरणात्मक सल्लागार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. आगामी हंगामात लखनऊला आयपीएल ट्रॉफी मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतील.
लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझीकडून सांगितले गेले की, “एमएसके प्रसाद प्रतिभा शोधण्यासाठी आणि प्रतिभावान खेळाडू घडवण्यासाठी फ्रँचायझीची मदत करतील.” दरम्यान, एमएसके प्रसाद भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख राहिले आहेत. भारतीय संघासोबत कामचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहेत. “प्रसाद आपल्यासोबत मोठा अनुभव आणि क्रिकेटमधील शानदार ट्रॅक रेकॉर्ड घेऊन येत आहेत. हे एक उत्साही व्यक्तिमत्व आहे, ज्याच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता आपल्या संघालाही या अनुभवाची साथ मिळेल,” असे लखनऊ फ्रँचायझीकडून सांगितले गेले आहे.
दरम्यान, एमएसके प्रसाद यांना बीसीसीआयसोबत कामाचा आनुभव आहेच. पण सोबतच ते आंध्रा क्रिकेट असोसिएशनच्या डायरेक्टरपदी काम केले आहे. भारतीय संघाच्या प्रमुख निवडकर्तेपदी प्रासद यांनी चार वर्ष कामकाज पाहिले. 2020 नंतर ते या जबाबदारीतून मुक्त झाले. त्याच्या कार्यकाळात भारताने 2018-19 आणि 2021-21 साली ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली आणि इतिहासात आपले नाव कोरले. यादम्यानच्या काळात जस्टिन लँगर ऑस्ट्रेलिाचे मुख्य प्रशिक्षक होते. आता हेच लँगर आगामी आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जायंट्सच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पाहणार आहेत.
असे असले तरी, लखनऊ सुपर जायंट्स संघ आतापर्यंत दोन आयपीएल खेळला आहे. या दोन्ही हंगामांमध्ये लंखनऊला प्लेऑफमध्ये स्थान मिळाले. पण संघ विजेतेपद मिळवू शकला नाही. यावर्षी लखनऊ नव्या प्रशिक्षकांसह नव्या धोरणात्मक सल्लागारासह खेळणार आहे. अशात फ्रँचायझीलाही विजेतेपदाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (IPL 2024 MSK Prasad joins LSG as a strategic consultant.)
महत्वाच्या बातम्या –
IPL । डबघाईत आलेली दिल्ली फ्रँचायझी अक्षय कुमारमुळे वाचली! झेलले कोट्यावधींचे नुकसान
आशिया चषकातून सॅमसनचा पत्ता टक? ‘या’ तारखेळा संघ घोषित होण्याची शक्यता