आयपीएल स्पर्धा 2024 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्याआधी संघांमध्ये बदलाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मग ते कर्णधार असो की, इतर काही गोष्टी असो. अशातच दुसरीकडे, यंदाच्या वर्षात मुंबई इंडियन्स संघ या ना त्या कारणाने चर्चेत आला आहे. मग ते ट्रेड विंडोने हार्दिक पांड्याला घेणं असो, रोहित शर्माचं कर्णधारपद पांड्याकडे सोपवणं असो की जसप्रीत-सूर्याचे क्रिप्टिक मेसेज असो याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे.
यानंतर आता मुंबई इंडियन्स फ्रेंचायसी आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. ती म्हणजे नव्या जर्सीमुळे, कारण कर्णधार बदल्यानंतर मुंबई इंडियन्सने जर्सीही बदलली आहे. त्यामुळे नव्या जर्सीत काय बदल आहेत याची उत्सुकता लागून आहे. मुंबई इंडियन्सने नुकतीच आयपीएलसाठी नवीन जर्सी सर्वान समोर आणली आहे. तर ही जर्सी प्रसिद्ध डिझायनर मोनिषा जयसिंग यांनी डिझाईन केली आहे.
मुंबई इंडियन्सच्या जुन्या जर्सीप्रमाणेच नव्या जर्सीच रंग निळा आहे. तर निळ्या रंगाच्या जर्सीवर खांद्याच्या बाजूला सोनेरी पट्टे आहेत. त्यामुळे जर्सी तशीच तर आहे हा प्रश्न सर्वाना पडेल. मग नवीन काय बदल केला आहे? असा प्रतिप्रश्नही समोर येईल. फक्त एम हे अक्षर संपूर्ण जर्सीमध्ये तुम्हाला दिसून येत आहे. तसेच आयपीएलच्या १७ व्या हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. त्याचबरोबर च्या नेतृत्वात रोहित शर्मा फलंदाजी करताना पहायला मिळणार आहे.
💭 ʙᴇʜɪɴᴅ ᴛʜᴇ 👕#OneFamily #MumbaiIndians #IPL2024 @skechersGOin pic.twitter.com/NNPye0y6NX
— Mumbai Indians (@mipaltan) March 7, 2024
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्च रोजी रविवारी गुजरात टायटन्ससोबत आहे. गेल्या दोन पर्वात हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचं नेतृत्व सांभाळलं होतं. आता त्याच संघाविरोधात मैदानात उतरणार आहे.
𝗠𝗨𝗠𝗕𝗔𝗜 𝗜𝗡𝗗𝗜𝗔𝗡𝗦 🆇 𝗦𝗞𝗘𝗖𝗛𝗘𝗥𝗦
👕 आपली Men’s team 𝕁𝔼ℝ𝕊𝔼𝕐 is here! 🤩
Pre-order here 👉 https://t.co/YfTjNo3fWd#OneFamily #MumbaiIndians #IPL2024 @skechersGOin pic.twitter.com/2tHpWVbSNQ
— Mumbai Indians (@mipaltan) March 7, 2024
आयपीएलच्या १७ व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ पुढीलप्रमाणे :- रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, नेहल वढेरा, शम्स मुलानी, विष्णू विनोद, पियुष चावला, डेवाल्ड ब्रेविस, जेसन बेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय. रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, नमन धीर, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
- रहाणे, अय्यर, पृथ्वी सगळेच फेल झाल्यावर ‘लॉर्ड’ ठाकूर आला मुंबईच्या मदतीला! अवघ्या 37 चेंडूत ठोकलं अर्धशतक
- IPL 2024 : मोठी बातमी! दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत वाढ, ऋषभ पंतचे पुनरागमन लांबणीवर