आयपीएल 2024 च्या 67व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टिरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहाल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा
इम्पॅक्ट प्लेअर्स – रोहित शर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलानी, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवि बिश्नोई, मोहसिन खान
इम्पॅक्ट प्लेअर्स – नवीन-उल-हक, अॅश्टन टर्नर, मणिमारन सिद्धार्थ, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौथम
आयपीएल 2024 मधील दोन्ही संघांचा प्रवास संपला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे, तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सनं हा सामना मोठ्या फरकानं जिंकला तरीही ते टॉप-4 मध्ये स्थान मिळवू शकणार नाहीत. तीन सामन्यांतील सलग पराभवांमुळे लखनऊचा रन रेट खूपच खराब झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघाची इच्छा त्यांच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करायची असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषक संघात निवड झालेल्या भारतीय खेळाडूला गौतम गंभीरचा सल्ला; म्हणाला, “तुझ्याकडे खूप अनुभव, पण…”
कोहली, रोहित नाही तर हे आहेत जय शाह यांचे 3 आवडते क्रिकेटपटू, जाणून घ्या
राजस्थानच्या टॉम कोहलर कॅडमोरनं घातलेला खास नेक बँड काय आहे? क्रिकेटमध्ये त्याचं काय काम? जाणून घ्या