इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) 17वा हंगाम शुक्रवार, 22 मार्चपासून सुरू झाला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमनेसामने आहेत. हा सामना महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळला जातोय.
मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथमच आयपीएल सामना खेळला जात आहे. या स्टेडियमची स्थापना 2021 मध्ये झाली होती. येथील विकेट संथ आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये येथे कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळतात. दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामना दिवसा खेळला जात असल्यानं विकेट संथ राहण्याची अपेक्षा आहे.
महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 38 हजार आहे. हे स्टेडियम आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जचं होम ग्राउंड असेल. पंजाब किंग्सनं मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम मधून येथे आपला तळ हलवला आहे.
मुल्लानपूर स्टेडियमवर अनेक देशांतर्गत सामने खेळले गेले आहेत. या स्टेडियमनं 2022 आणि 2023 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) चे अनेक टी 20 सामने आयोजित केले होते. मुल्लानपूर स्टेडियमवर आतापर्यंत एकूण सामने 23 टी 20 सामने खेळले गेले. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 15 सामने जिंकले आहेत. तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघानं 8 सामन्यांत विजय मिळवला आहे.
या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 238/2 आहे, जी जम्मू-काश्मीर विरुद्ध अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामन्यादरम्यान बनली होती. तर सर्वात कमी धावसंख्या (53) मेघालय विरुद्ध हरियाणा सामन्यात बनली होती. हे मैदान लो स्कोअरिंग आहे. या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 148 धावा आहे. तर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या 116 आहे. मैदानावर एकूण 247 षटकार, 438 चौकार, 18 अर्धशतक आणि 1 शतक बनलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या पहिल्या सामन्यातच राडा! विराट कोहलीची रचिन रवींद्रला जाहीर शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल
मुस्लिम मुलीसोबत प्रेम आणि नंतर लग्न, अशी आहे शिवम दुबेची फिल्मी लव्हस्टोरी