आयपीएल 2024 च्या दुसऱ्या सामन्यात आज (23 मार्च) दिल्ली कॅपिटल्स समोर पंजाब किंग्जचं आव्हान आहे. मोहालीच्या मुल्लानपूर स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतनं तब्बल 14 महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलं.
ऋषभ पंत नाणेफेकीला आल्यानंतर त्यानं दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनचा खुलासा केला. या टीममधून एक महत्त्वाचा खेळाडू बाहेर असल्याचं दिसून आलं. दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये युवा सलामीवीर पृथ्वी शॉला संधी मिळाली नाही. टीमनं त्याला सामन्याच्या पहिल्या अकरामधून बाहेर ठेवलं आहे.
पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पाहून चाहतेही थोडे आश्चर्यचकित झाले आहेत. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. प्लेइंग इलेव्हनमध्ये पृथ्वी शॉचं नाव नसल्यामुळे आता चाहते सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
दिल्लीच्या फॅन्सला यंदा सलामीवीर पृथ्वी शॉकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. डेव्हिड वॉर्नरसह पृथ्वी शॉनंही चांगली फलंदाजी केली तर विरोधी संघाचे गोलंदाज अडचणीत येऊ शकतात. शॉ दुखापतीनंतर मैदानात परतला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याला एकही मोठी खेळी खेळता आली नाही, मात्र त्यानं आपल्या छोट्या खेळीनं नक्कीच मुंबईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मागील आयपीएल हंगाम त्याच्यासाठी चांगला नव्हता. एकूण 8 सामने खेळताना शॉनं केवळ 106 धावा केल्या. त्याची सरासरी 13.25 आणि स्ट्राइक रेट 124.71 एवढा राहिला. मागील हंगामात त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आलं.
आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सचा पूर्ण संघ – ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्रा, रिकी भुई, शाई होप, पृथ्वी शॉ, यश धुल, स्वस्तिक चिकारा, डेव्हिड वॉर्नर, प्रवीण दुबे, अक्षर पटेल, मिचेल मार्श, ललित यादव, विकी ओस्तवाल, सुमित कुमार, एनरिक नॉर्किया, मुकेश कुमार, खलील अहमद, कुलदीप यादव, इशांत शर्मा, जेक फ्रेझर-मॅकगर्क, जे रिचर्डसन, रसिक सालेम, जेक फ्रेझर-मॅकगर्क.
महत्त्वाच्या बातम्या-
मुल्लानपूर स्टेडियमचं आयपीएल पदार्पण! जाणून घ्या कसं आहे पंजाब किंग्जचं नवं होम ग्राऊंड
मुस्लिम मुलीसोबत प्रेम आणि नंतर लग्न, अशी आहे शिवम दुबेची फिल्मी लव्हस्टोरी