IPL 2024 Qualification Scenarios : इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवार (दि. 15) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात स्पर्धेतील 30वा सामना झाला. ऐतिहासिक झालेल्या या सामन्यात आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्यात आली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या हैद्राबाद संघाने आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुने पाठलाग करतानाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. असे असतानाही आरसीबीचा पराभव झाला. परंतू या पराभवासह बंगळुरु संघाच्या हातातून यंदाची ट्रॉफी निसटल्याचे दिसत आहे.
चिन्नास्वामी स्टेडियमवर हैद्राबादने आयपीएल इतिहासातील 287 धावांचा सर्वात मोठा डोंगर उभा केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना बंगळुरुने 262 धावा केल्या. 25 धावांनी पराभव स्विकारावा लागला. हा आरसीबीला सलग 6वा पराभव आहे. सात सामस्यात आरसीही 6 वेळा पराभूत झालीये. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत आरसीबी संघासाठी ट्रॉफी जिंकणे अत्यंत कठीण बनले आहे. सध्या गुणतालिकेत 10 व्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीला आता प्लेऑफ मध्ये स्थान मिळवणे जवळपास कठीण बनले आहे. ( IPL 2024 Qualification Scenarios How can Royal Challengers Bengaluru qualify for playoffs after losing to SRH )
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स संघ टॉपवर आहे. राजस्थान 6 सामन्यातील 5 विजयासह 10 गुणांनी प्रथम स्थानी आहे. त्याखाली दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स 5 सामन्यातील 4 विजयासह 8 गुण घेत दुसऱ्या स्थानी आहे. 8 गुणांसह परंतू रनरेट कमी असल्याने चेन्नई सुपर किंग्ज तिसऱ्या स्थानी तर सनरायझर्स हैदराबाद संघ +0.502 नेट रनरेटसह 8 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
या गुणतालिकेत, लखनऊ सुपर जाएन्ट्स 6 गुणांसह 5व्या स्थानी, गुजरात टायटन्स 6 व्या स्थानी, सातव्या क्रमांकावर 4 गुणांसह पंजाब किंग्जचा संघ आहे. आठव्या स्थानावर 6 सामन्यात दोन विजयासह मुंबई इंडियन्स संघ आहे. तर नवव्या स्थानी दिल्ली आहे. दिल्लीचे 6 सामन्यात दोन विजयाने 4 गुण आहेत. परंतू, सलग 6 व्या पराभवानंतर आरसीबीचा संघ 10 क्रमांकावर फेकला गेलाय. आणि आरसीबीकडे -1.185 नेट रनरेट आहे.
आरसीबीने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एक विजय मिळवलाय. आरसीबीचे अजून 7 सामने बाकी आहेत. त्यामुळे जर आरसीबीला स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर सर्वच्या सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे आता आरसीबीसाठी प्रत्येक सामना हा ‘आर या पार’ असा असेल.