आयपीएल 2024 च्या प्लेऑफ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहिलेले कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादचे संघ आमनेसामने असतील.
केकेआरनं 20 गुण प्राप्त करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. तर हैदराबादचा संघ 17 गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. अहमदाबादचं मैदान दोन्ही संघांचं घरचं मैदान नाही. त्यामुळे हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो की, आयपीएल 2024 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात खेळपट्टी कशी राहील? चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुमच्या सर्व शंका दूर करतो.
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी मुख्यत्वे फलंदाजांसाठी चांगली मानली जाते. आयपीएल 2024 च्या हंगामात या मैदानावर धावांचा पाऊस पडला आहे. याचा विचार करता, कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यात देखील भरपूर धावा बनू शकतात. या खेळपट्टीवर वेगवान गोलदाजांना देखील मदत मिळते. या मैदानावर मागील 5 सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. यामुळे येथे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.
तुम्हाला आठवत असेल, 2023 विश्वचषकाचा अंतिम सामना याच मैदानावर खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडनं 120 चेंडूत 137 धावांची खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. आयपीएलच्या या हंगामात हैदराबादकडून खेळणारा ट्रॅव्हिस हेड तुफान फार्मात आहे. त्यानं आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांच्या जोरावर 533 धावा ठोकल्या आहेत.
दुसरीकडे, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 10 षटकांत केवळ 34 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. तर आयपीएल 2024 मध्ये या मैदानावर झालेल्या सामन्यात त्यानं गुजरात टायटन्सविरुद्ध 4 षटकांत केवळ 28 धावा देऊन 1 विकेट घेतली होती. नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असल्यानं हैदराबादचे तुफानी फलंदाज येथे मोठी धावसंख्या उभारू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ 5 कारणांमुळे ‘थाला’ची टीम आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहचू शकली नाही; जाणून घ्या