IPL 2024 : आयपीएलचा 17 वा हंगाम कधी आणि केव्हा सुरू होणार यावर अनेक प्रश्न निर्माण केले होते. पण ही स्पर्धा 22 मार्चपासून ही सुरू होणार आहे, अशी आशा चाहत्यांना आहे. याबरोबरच आता चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) सीईओ काशी विश्वनाथन यांनीही याबाबत माहिती दिली आहे. तथापि, यापूर्वी आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमळ यांनीही 22 मार्चपासून स्पर्धा सुरू करण्याची योजना असल्याचे सांगितले होते. तसेच काशी विश्वनाथन यांनी उद्घाटन सोहळ्याबाबत एक मोठी माहिती सध्या समोर आली आहे.
याबरोबरच, आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार असल्याचा दावाही अहवालात केला जात आहे. तसेच अहवाल समोर आल्यानंतर चेन्नई आणि बंगळुरूच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे चेन्नईचा संघ गेल्या आयपीएल हंगामातील विजेता संघ आहे, तर दुसरीकडे आरसीबी संघ पहिला ट्रॉफी उचलण्याचे स्वप्न पाहत आहे. दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
https://twitter.com/Babu_K_08/status/1760513751168794779
आत्तापर्यंत आयपीएलच्या इतिहासात महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ आहे. तसेच चेन्नईने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 16 आयपीएल स्पर्धांमध्ये 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. याबरोबरच चेन्नईशिवाय मुंबईनेही 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर दुसरीकडे, विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रत्येक मोसमात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करते, परंतु आजपर्यंत त्यांचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न एकदाही पूर्ण झालेले नाही. आत्तापर्यंत चेन्नई आणि आरसीबी आयपीएलमध्ये एकूण 31 वेळा आमनेसामने आले आहेत.
यामध्ये चेन्नईने आरसीबीविरुद्ध खेळलेल्या एकूण 31 सामन्यांपैकी 20 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे, आरसीबीला सीएसकेविरुद्ध केवळ 10 सामने जिंकता आले आहेत, तसेच एक सामना अनिर्णित राहिला आहे. यावरून हे स्पष्ट होते की सीएसके हेड टू हेड स्पर्धेत आरसीबीपेक्षा खूप पुढे असलेली पहायला मिळत आहे. यामुळे जर आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यात आरसीबी आणि सीएसके यांच्यात सामना झाला, तर कोहलीच्या संघाला अधिक सावध राहून चांगले खेळण्याची गरज आहे.
https://twitter.com/mahicharan31/status/1759557522417955298
दरम्यान, एकाच डावात सर्वोच्च सीएसकेने बंगळुरूविरुद्ध सर्वाधिक 226 धावा केल्या आहेत. याशिवाय चेन्नईविरुद्धच्या एकाच सामन्यात बंगळुरू संघाने 218 धावा केल्या होत्या. याबरोबरच, दुसरीकडे, जर किमी स्कोअरबद्दल सांगायचे झाले तर RCB ने CSK विरुद्ध एका डावात 70 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, CSK संघाने एका सामन्यात RCB विरुद्ध 82 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –






