इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये आज (29 मार्च) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चौकार-षटकारांची आतषबाजी होणार आहे. कारण आज हार्ड हिटर्सनं भरलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्सचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत! या सामन्याची खास बाब म्हणजे, गौतम गंभीर आयपीएलच्या या हंगामात केकेआरचा मेंटॉर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात फॅन्सना पुन्हा एकदा विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर अशी लढत पाहायला मिळणार आहे.
आरसीबीची फलंदाजी विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसपासून सुरू होते, जी ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, रजत पाटीदार अनुज रावत, दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोरपर्यंत लांबते. या सर्व फलंदाजांकडे मोठी धावसंख्या उभारण्याची आणि धावांचा पाठलाग करण्याची क्षमता आहे.
दुसरीकडे, केकेआरच्या फलंदाजीची सुरुवात स्फोटक फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांच्यापासून होते. त्यांच्यानंतर व्यंकटेश अय्यर, कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतात. तर खालच्या फळीतील रमणदीप सिंग, रिंकू सिंह आणि आंद्रे रसेल यांच्यात कोणत्याही भक्कम गोलंदाजीला पाणी पाजण्याची ताकद आहे. या दोन्ही संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे एकहाती सामन्याची दिशा पलटवू शकतात.
आरसीबी विरुद्ध केकेआर हेड-टू-हेड
एकूण सामने – 32
केकेआर विजयी – 18
आरसीबी विजयी – 14
आयपीएल 2024 मध्ये केकेआरचा हा दुसरा सामना आहे, तर आरसीबी आपला तिसरा सामना खेळत आहे. कोलकातानं पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 4 धावांनी रोमहर्षक पराभव केला होता. तर आरसीबीचा या हंगामातील सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 6 गडी राखून पराभव केला. मात्र दुसऱ्या सामन्यात संघानं पंजाब किंग्जवर 4 गडी राखून विजय मिळवला.
पिच बद्दल बोलायचं झालं तर, चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी सर्वसाधारणपणे सपाट आणि फलंदाजीसाठी अनुकूल असते. अशा परिस्थितीत हा सामना हाय स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे. येथे पॉवरप्लेमध्ये फलंदाज खुलेपणानं शॉट्स खेळतात. तसेच या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूनं हालचाल मिळते. फिरकीपटूंबद्दल बोलायचं झालं तर ते या खेळपट्टीवर नेहमीच महागडे ठरतात. चिन्नास्वामी स्टेडियमची सीमारेषा लहान आहे, त्यामुळे जास्त चौकार आणि षटकार मारले जातात.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडगे, मयंक डागर, विजय कुमार, दीपकुमार वैशाख, विजय कुमार , मोहम्मद सिराज, रीस टॉपली, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंह, रहमानउल्ला गुरबाज, फिल सॉल्ट, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रियान परागनं टाकलं विराट कोहलीला मागे, पर्पल कॅपवर ‘या’ विदेशी खेळाडूचा कब्जा
राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा पुन्हा पराभव, ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाचं कारण काय?