आयपीएल 2024 चा सहावा सामना सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. होळीच्या दिवशी झालेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून भरपूर धावा निघाल्या आणि आरसीबीनं हा सामना चार विकेटनं जिंकला.
विराट कोहलीनं 49 चेंडूत 77 धावांची खेळी खेळली, ज्यासाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. सामन्यादरम्यान, शिखर धवनचा एक डुप्लिकेट स्टेडियममध्ये दिसला, ज्यानं पंजाब किंग्जची जर्सी घातली होती. विशेष म्हणजे, त्यानं शिखर धवनसारखीच केशरचना केली होती.
पंजाब किंग्जची फलंदाजी सुरू होती. शिखर धवन डगआउटमध्ये खूप गंभीर बसला होता कारण त्यावेळी संघाची स्थिती फारशी चांगली नव्हती. तेव्हा स्क्रीनवर शिखर धवनचा डुप्लिकेट दाखवला गेला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेला विराट कोहली स्क्रीनवर शिखर धवनचा डुप्लिकेट पाहून हसला. विराट कोहलीचं हास्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तंर, आरसीबीनं नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पंजाब किंग्जने 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या. कर्णधार शिखर धवननं 37 चेंडूत 45 धावा केल्या. शशांक सिंगने शेवटी काही दमदार शॉट्स मारले आणि 8 चेंडूत 21 धावा करून नाबाद परतला.
आरसीबीतर्फे मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. याशिवाय यश दयालनं चार षटकात एक विकेट घेतली परंतु त्यानं केवळ 5.80 च्या इकॉनॉमी रेटनं धावा केल्या. सिराजनंही चार षटकांत केवळ 26 धावा दिल्या. प्रत्युत्तरात आरसीबीनं 19.2 षटकांत 6 गडी गमावून 178 धावा करत सामना जिंकला. दिनेश कार्तिक 10 चेंडूत 28 धावा करून नाबाद परतला. महिपाल लोमरने 8 चेंडूत नाबाद 17 धावा केल्या. या विजयासह बंगळुरूनं गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जुनं ते सोनं! क्रिकेटपटू ते समालोचक अन् आता फिनिशर; अशी आहे दिनेश कार्तिकची कारकीर्द
विराट कोहलीनं सॅम करनकडून हिसकावली ऑरेंज कॅप, ‘या’ गोलंदाजाकडे पर्पल कॅपचा ताबा
कसोटी क्रिकेटचा थरार वाढणार! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आता चारऐवजी पाच सामने खेळले जाणार