यंदाच्या आयपीएल लिलावात अनेक खेळांडूवर विक्रमी बोली लागत असताना काही भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर कोट्यवधीची उधळण झाली आहे. हे अनकॅप्ड खेळाडू आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. अशांपैकीच एक आहे, झारखंडमधील रांचीचा ख्रिस गेल रॉबिन मिंझला गुजरात टायटन्स संघाने ३ कोटी ६० लाख रुपये खर्च करून रॉबिनला त्यांच्या संघात घेतले होते.
याबरोबरच,झारखंडच्या रॉबिन मिन्झला गुजरात टायटन्सने 3.6 कोटी रुपयांना विकत घेतले. या मिनी लिलावानंतर रॉबिन मिन्झचे वडील चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते चर्चेत आहेत. खरंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने रॉबिन मिन्झच्या वडिलांची गुजरात विमानतळावर भेट घेतली आहे. कारण भारतीय संघ चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी रांचीला पोहोचली तेव्हा रॉबिन मिंजचे वडील फ्रान्सिस झेवियर मिन्झ यांनी विमानतळावर शुभमन गिलची भेट झाली आहे.
यावेळी रॉबिनच्या वडिलांनीही आपल्या मुलाला गुजरात टायटन्समध्ये नेल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय गुजरात टायटन्सने यावेळी आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावावे यासाठी त्याने शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तसेच रॉबिनचे वडीलही गिलसोबतच्या भेटीत थोडे भावूक झाले होते. या व्हिडिओवर चाहतेही त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते शुभमन गिलचे खूप कौतुक करत आहेत.
Humility exemplified as Captain Gill meets Francis Minz, our new Titan, Robin Minz's father! 💙#AavaDe pic.twitter.com/WUhQXMx4R8
— Gujarat Titans (@gujarat_titans) February 28, 2024
दरम्यान, रॉबिन मिन्झ हा आयपीएलमध्ये खेळणारा पहिला आदिवासी क्रिकेटपटू ठरणार आहे, हे विशेष. गेल्या दोन वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये रॉबिन मिन्झ चमकदार कामगिरी करत आहे. तसेच यंदा मुंबई इंडियन्सने इंग्लंडमध्ये 30 खेळाडूंचे शिबिर आयोजित केले होते. रॉबिन मिन्झचा खेळ पाहिल्यानंतर त्याचाही या शिबिरात समावेश करण्यात आला. लिलावानंतर रॉबिन मिन्झच्या वडिलांनी सांगितले होते की, काही दिवसांपूर्वी त्यांनी महेंद्रसिंग धोनीची रांची विमानतळावर भेट घेतली होती. यावेळी, माजी भारतीय कर्णधाराने त्याला सांगितले होते की, जर कोणत्याही संघाने रॉबिन मिन्झला लिलावात खरेदी केले नाही, तर चेन्नई सुपर किंग्ज त्याला नक्कीच संघात घेईल.
महत्वाच्या बातम्या –
- WPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने रोमहर्षक सामन्यात आरसीबीचा केला 25 धावांनी पराभव, स्मृती मंधानाची झंझावाती खेळी व्यर्थ
- हार्दिक पांड्याने पदार्पण केल्यापासून फ्रेंचायझीसाठी खेळला जवळजवळ 89% आयपीएल सामने, अन् पाहा तो भारतासाठी किती सामने खेळला