---Advertisement---

“आम्ही प्रत्येक सामना जिंकू शकत नाही…”, आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर नाराज पॅट कमिन्सची प्रतिक्रिया

On: शुक्रवार, एप्रिल 26, 2024 12:43 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 च्या 41व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला. आरसीबीनं हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर 35 धावांनी पराभूत केलं. हैदराबादचा आयपीएलच्या या हंगामातील हा तिसरा पराभव आहे. या पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “हे टी20 क्रिकेट आहे आणि आम्ही प्रत्येक सामना जिंकू शकत नाही.”

पॅट कमिन्स म्हणाला, “हा सामना आमच्यासाठी चांगला राहिला नाही. गोलंदाजीत आमचे काही ओव्हर सामान्य राहिले. तर फलंदाजीत आम्ही काही विकेट लवकर गमावल्या. आम्ही प्रथम फलंदाजी करणार होतो. असं वाटतंय की ते आमच्यासाठी योग्य आहे. काही सामन्यांआधी आम्ही विचार करत होतो की, प्रथम गोलंदाजी करणं आमच्यासाठी योग्य आहे. परंतु तसं नाही.”

कमिन्स पुढे बोलताना म्हणाला की, मी विजय मिळवल्यानंतर बोलतो, तर डॅनियर व्हिटोरी पराभव झाल्यानंतर. आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. हे टी20 क्रिकेट आहे. तुम्ही प्रत्येक सामना जिंकू शकत नाही. यावर जास्त विचार करण्याची गरज नाही.” हैदराबादच्या कर्णधारानं त्यांच्या आक्रमक फलंदाजीबद्दल बोलताना सांगितलं की, “माझ्या मते ही आमची जमेची बाजू आहे. हे प्रत्येक सामन्यात लागू होणार नाही. सुरुवातीच्या एक-दोन सामन्यांमध्ये जेव्हा ही योजना आमच्या बाजूनं गेली नाही, तेव्हा देखील आम्ही मोठा स्कोर उभा केला होता.”

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 206 धावा केल्या होत्या. संघासाठी रजत पाटीदार आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी खेळी खेळल्या. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना हैदराबादची टीम 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 171 धावाच करू शकली. अशाप्रकारे आरसीबीनं हा सामना 35 धावांनी जिंकला.

या विजयानंतर आरसीबीचे 9 सामन्यात 4 गुण झाले आहेत. गुणतालिकेत ते अजूनही शेवटच्या स्थानावर आहेत. हैदराबादची टीम 8 सामन्यांत 10 अंकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

किंग कोहलीचा मोठा विक्रम ! ‘अशी’ कामगिरी करणारा विराट एकमेव खेळाडू, वाचा कोहलीच्या खास विक्रमाबद्दल…

काय सांगता ? 17 वर्ष आरसीबीसाठी खेळूनही विराटला जो पराक्रम करता आला नाही तो काल आलेल्या रजत पाटीदारने केला

तब्बल 1 महिन्यानंतर आरसीबीने खाल्ला विजयाचा घास, नोंदवला हंगामातील दुसरा विजय, हैद्राबादवर 35 धावांनी केली मात । RCB Vs SRH

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---