स्मार्ट रिप्ले सिस्टमने आयपीएलमध्ये क्रांती घडवली आहे. यामुळे क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर याबद्दल एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सामनाधिकारी श्रीनाथ आणि पंच नितिन मेनन हे हे तंत्रज्ञान समजून सांगताना दिसत आहेत.
सामनाधिकारी जवागल श्रीनाथ आणि पंच नितीन मेनन यांनी IPL 2024 मध्ये लागू करण्यात आलेल्या ‘स्मार्ट रिप्ले सिस्टम’चे कौतुक केले आहे. त्यांनी या सिस्टमचे फायदे स्पष्ट केले आहेत. या तंत्रज्ञानामुळे सामन्याच बराच वेळ वाचत असल्याचे श्रीनाथ सांगतात. ( IPL 2024 Srinath and Nitin Menon told how smart replay system brought revolution watch Video )
सुरुवातीला मेनन सांगतात की, ‘या तंत्रज्ञानामुळे आता कोणताही वाद राहत नसून फक्त खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले आहे. आयपीएलमधील सामन्यांदरम्यानचे निर्णय अचूक आणि चांगले घेण्यासाठी बीसीसीआयने ही प्रणाली लागू केली आहे. या अंतर्गत, टीव्ही अंपायरला दोन हॉक आय ऑपरेटरकडून थेट इनपुट प्राप्त होतात. ऑपरेटर पंचांना 8 हायस्पीड कॅमेऱ्यांनी घेतलेले व्हिज्युअल दाखवतात.’
व्हिडिओत पुढे श्रीनाथ म्हणतात की, “कोणत्याही टी-20 षटकांच्या सामन्यात प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो. प्रत्येक संघाला अचूकता हवी असते. चुकीचा निर्णय संघाला महागात पडू शकतो. जेव्हा तुम्ही LBW साठी DRS करता आणि चेंडू लेग साईडला पिच करत असल्याचे आढळले, तेव्हा तुम्हाला अधिक तपासण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत एका डावात 9 ते 9 मिनिटे वाचतात. कधीकधी गेममध्ये 20 मिनिटे बाकी असतात.
सामन्यात फुल टॉस कमरेच्या वर कसा तपासला जातो? याबद्दलही श्रीनाथ यांनी सांगितले आहे, ते म्हणाले की, “फोटो सत्रादरम्यान खेळाडूंची उंची तपासली जाते. मग ते प्रदर्शित केले जाते. सध्या तुम्हाला पडद्यावर (व्हिडिओत) सूर्यकुमार दिसत आहे. सूर्याच्या कमरेची उंची 1.02 आहे. बॉल ट्रॅकर 0.98 दाखवत आहे, म्हणजे बॉल कमरेच्या खाली आहे. यावर प्रश्नच नाही. खेळाडूंना या तंत्रज्ञानाबद्दल आत्मविश्वास आहे. ते निर्दोष आहे.”
Adding the 𝙋𝙍𝙀𝘾𝙄𝙎𝙄𝙊𝙉 in decision making 🎥🎙️
Making accurate calls while saving loads of time ⏰
Match Referee Javagal Srinath & Umpire Nitin Menon explain the revolutionary 𝗦𝗺𝗮𝗿𝘁 𝗥𝗲𝗽𝗹𝗮𝘆 𝗦𝘆𝘀𝘁𝗲𝗺 👌👌 – By @Moulinparikh & @mihirlee_58 #TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/phwXCGcPBe
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2024
अंपायर मेनन म्हणाले की, ‘जेव्हा निर्णय योग्य असतात, तेव्हा संघ आनंदी असतात आणि कोणतेही वाद नसतात. लक्ष फक्त खेळाडू आणि कामगिरीवर आहे, पंचावर नाही. मागच्या वर्षी चर्चा झाली तेव्हा आम्हाला ब्रॉडकास्टर डायरेक्टरशी बोलायचं होतं. आता थर्ड अंपायर आणि डायरेक्टरमधील चॅनल कट झाला आहे. आम्ही थेट हॉक-आय तंत्रज्ञांकडे जातो, जो स्क्रीनवर झटपट रिप्ले दाखवतो. यामुळे बराच वेळ वाचत आहे.”