शुक्रवारी (5 एप्रिल) झालेल्या आयपीएल 2024 च्या 18व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात हैदराबादनं चेन्नईवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जनं 20 षटकांत 4 गडी गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सनरायझर्स हैदराबादनं 18.1 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठलं. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 45 धावा केल्या.
166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला अभिषेक शर्मानं तुफानी सुरुवात करून दिली. अभिषेक 12 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. दीपक चहरनं त्याला बाद केले. ट्रॅव्हिस हेडनं 24 चेंडूत 31 धावा केल्या. मार्करम 36 चेंडूत 50 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शाहबाज अहमदनं 19 चेंडूत 18 धावांची खेळी खेळली.
15व्या षटकापर्यंत हैदराबाची धावसंख्या 3 बाद 135 धावा होती. त्यांना शेवटच्या 5 षटकात 31 धावांची गरज होती. 16व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोईन अलीनं शाहबाज अहमदला 18 धावांच्या स्कोअरवर बाद केलं. शेवटच्या 18 चेंडूत हैदराबादला 15 धावांची गरज होती. 18व्या षटकात तुषार देशपांडेनं 9 धावा दिल्या. शेवटच्या 2 षटकात हैदराबादला विजयासाठी फक्त 6 धावांची गरज होती. नितीश रेड्डीनं 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून हैदराबादला मोठा विजय मिळवून दिला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रचिन रवींद्र 12 धावा करून बाद झाला. रचिन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्यात पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी झाली. ऋतुराजनं 21 चेंडूत 26 धावा केल्या. शिवम दुबे 24 चेंडूत 45 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अजिंक्य रहाणेनं 30 चेंडूत 35 धावांची खेळी केली. मिचेल मार्श 11 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजानं 23 चेंडूत 31 धावांची खेळी केली. एमएस धोनीने दोन चेंडूत एक धाव घेतली. सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, पॅट कमिन्स, नटराजन आणि जयदेव उनाडकट यांनी 1-1 बळी घेतला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा
महत्त्वाच्या बातम्या-
अवघ्या 12 चेंडूत केलं काम तमाम! अभिषेक शर्मानं फोडून काढली चेन्नईची गोलंदाजी
आयपीएलमध्ये खेळाडूंच्या दुखापती थांबेना! आता चेन्नईचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर