---Advertisement---

IPL 2024 : आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंचा अन् कर्णधारांचा पगार बक्षीसाच्या रकमेपेक्षा जास्त, घ्या जाणून त्या खेळाडूंबाबत

IPL-2024-Auction
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2024 चा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी त्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात पुन्हा एकदा चॅम्पियन होण्यासाठी 10 संघांमध्ये चुरशीची लढत पाहिला मिळणार आहे.

याबरोबरच यंदाच्या हंगामात कोण विजेता होईल, याबाबत आधीच काहीही सांगणे जरा कठीण आहे. तरी क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा बॉल आणि बॅटमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार यात शंका नाही. मैदानावर चौकार आणि षटकार मारताना पाऊस पडताना पहायला मिळणार आहे. तसेच आयपीएलच्या मिनी लिलावात काही खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली आहे. तसेच त्यांच्यावर कर्णधारपदाची धुराही सोपवली आहे.

अशातच आयपीएलच्या इतिहासात विजेतेपदासाठी रक्कम ही 20 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळतात. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 7 कोटी आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला 7 कोटी रुपये मिळत असतात. मात्र या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विजेतेपदाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम देऊन फ्रेंचायसीने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला 20.50 कोटी रुपययांना घेतले आहे.

यासोबतच लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याला लखनौ फ्रँचायझी 17 कोटी रुपये एका हंगामाला देत असते. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ ऋषभ पंतला एका हंगामासाठी 16 कोटी देत असते. त्यानंतर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने 15 कोटी दिले आहेत. तसेच  राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला 14 कोटी एका हंगामाला भेटत असतात.

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा संघ श्रेयस अय्यरला 12.25 कोटी एका हंगामाला देत असतो. तसेच चेन्नई सुपर किंग्जचा संघ  एमएस धोनीला 12 कोटी रूपये देत असतो. तर पंजाब किंग्सचा संघ शिखर धवनला 8.25 कोटी देत असतो. तसेच आरसीबीचा संघ फाफ डू प्लेसिसला एका हंगामाला 7 कोटी देत असतो. तसेच  गुजरात टायटन्स शुबमन गिलला एका हंगामासाठी 7 कोटी देत असते.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---