आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 24वा सामना आरसीबी विरुद्ध डीसी यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरुचा त्यांच्याच होम ग्राऊंडमध्ये एकतर्फी पराभव केला. या सामन्यात केएल राहुलने (93) मॅच विनिंग खेळी खेळली. आरसीबीने पहिल्या डावात खेळताना मर्यादित 20 षटकात 163/7 धावा केल्या. ज्या दिल्ली कॅपिटल्सने 17.5 षटकांत पूर्ण केल्या.
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 7 गडी गमावून 163 धावा केल्या. यादरम्यान फिलिप सॉल्ट आणि टिम डेव्हिड यांनी स्फोटक खेळी केली. सॉल्टने 17 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याने 37 धावांची खेळी खेळली. तर टिम डेव्हिड 37 धावांसह नाबाद राहिला. त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. विराट कोहलीने 14 चेंडूत 22 धावा केल्या. रजत पाटीदारने 25 धावांचे योगदान दिले.
164 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात काहीशी धक्कादायक ठरली. अवघ्या 10 धावांवर दोन्ही सलामीवीर माघारी परतले आणि संघ अडचणीत सापडला. त्यानंतर अभिषेक पोरेलने काही काळ टिकून खेळ केला, पण तोही 30 धावांवर बाद झाला. कर्णधार अक्षर पटेल फक्त 58 धावांवर तंबूत परतला आणि दिल्लीचा डाव डळमळू लागला.
???????????????????????????????? = ???????????????????????????? ???????? ???????? & ???????????????????????? ????
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2025
???? KL Rahul and Tristan Stubbs launch an attack to ignite #DC's chase ????
They need 30 off 24.
Updates ▶ https://t.co/h5Vb7sp2Z6#TATAIPL | #RCBvDC | @DelhiCapitals | @klrahul pic.twitter.com/LICgoUF3xy
मात्र, त्यानंतर केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स या जोडीने खेळात स्थैर्य आणलं. दोघांनी संयमी सुरुवात करत डावाला आकार दिला आणि योग्य वेळी गिअर बदलत आक्रमण सुरू केलं. सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला 15वं षटक, जेव्हा केएल राहुलने जोश हेझलवूडला जबरदस्त फटकेबाजी करत त्या षटकात 22 धावा फटकावल्या.
तेव्हा दिल्लीला जवळपास 36 चेंडूत 65 धावांची गरज होती आणि त्या एकाच षटकात समीकरणं बदलली. आरसीबीसाठी ते षटक फार महाग ठरलं. उरलेल्या दोन-तीन षटकांत दिल्लीने एकतर्फी विजय मिळवत सामना आपल्या नावावर केला.






