जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचा पुढील हंगाम एप्रिल महिन्यापासून खेळला जाईल. यासाठी खेळाडूंचा मिनी लिलाव पुढील महिन्यात पार पडेल. तत्पूर्वी खेळाडूंची ट्रेडिंग विंडो सुरू झाली असून, आता त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
मागील आठवड्यात सुरू झालेल्या ट्रेडिंग विंडोतील पहिला ट्रेड मुंबई इंडियन्स व लखनऊ सुपरजायंट्स यांनी केला होता. त्यानुसार लखनऊ संघाने आपला अष्टपैलू रोमारियो शेफर्ड याला मुंबईकडे पाठवले आहे. त्यानंतर आता इतरही ट्रेडबाबत माहिती समोर येताना दिसते.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सचा युवा फिरकीपटू आर साईकिशोर व सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांना आपल्याकडे घेण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सकडे इंग्लंडचा अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन याची मागणी केल्याचे समजते.
एका आघाडीच्या क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान शार्दुल ठाकूर व हर्षल पटेल यांच्या अदलाबदलीचा करार जवळपास पूर्णत्वास आल्याचे समजते. तर कोलकाता नाईट रायडर्सने सुयश शर्मा याच्या बदल्यात सनरायझर्स हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर याला देखील आपल्याकडे खेचले असल्याचे खात्रीलायक सूत्र आहे. मात्र, या कोणत्याही ट्रेडबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
आयपीएलची ही ट्रेडिंग विंडो लिलावाच्या दोन दिवस आधीपर्यंत चालेल. यावर्षी आयपीएल चा लिलाव दुबई येथे होईल. आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स यांनी सर्वाधिक प्रत्येकी पाच वेळा विजेतेपद जिंकले आहे.
(IPL 2024 Trading Window Mumbai Indians Want Kartik Tyagi And Sai Kishore)
हेही वाचा-
दिग्गजांना पछाडत बोल्टने घडवला इतिहास, बनला विश्वचषकात न्यूझीलंडसाठी ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
पीसीबीकडून इंझमाम उल हकचा राजीनामा मंजुर, लावले होते ‘हे’ मोठे आरोप