IPL 2024 Trading Window: आयपीएल 2024 लिलाव पूर्ण झाला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा ट्रेडिंग विंडो खुली झाली आहे. ही विंडो खुली झाल्यामुळे पुन्हा एकदा फ्रँचायझी इतर संघांच्या खेळाडूंना इतर संघांसोबत ट्रेड करू शकणार आहेत. आता ही विंडो कधीपर्यंत खुली राहणार आणि यातील नियम काय असतील? याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. यासोबतच हीदेखील चर्चा सुरू झाली आहे की, रोहित शर्मा अजूनही मुंबई इंडियन्स सोडू शकतो का? यासाठी चला नियमाविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
काय आहे ट्रेडिंग विंडोचे नियम?
आयपीएलमध्ये एक खेळाडू इतर कोणत्याही खेळाडूच्या बदली किंवा रोख रक्कमेच्या बदली इतर संघाशी जोडला जातो, तेव्हा त्याला ट्रेडिंग (IPL Trading) असे म्हणतात. ही प्रक्रिया ट्रेडिंग विंडोमार्फत होऊ शकते. ट्रेडिंग विंडो (IPL Trading Window) एक आयपीएल हंगाम संपल्याच्या एका महिन्यानंतर लिलावाच्या एक आठवड्यापूर्वीपर्यंत खुली असते. म्हणजेच 12 डिसेंबरपर्यंत ही विंडो खुली होती. त्यानंतर 19 डिसेंबर रोजी लिलावाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी ही विंडो पुन्हा खुली झाली आहे. आता ट्रेडिंग विंडो पुढील वर्षी फेब्रुवारी 2024पर्यंत खुला राहणार आहे.
आयपीएल 2024 हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच हंगाम सुरू होण्याच्या जवळपास 1 महिन्यापूर्वीपर्यंत ही विंडो खुली राहील. आता लिलावानंतर संघांच्या पर्समध्ये जास्त रक्कम शिल्लक राहिली नाहीये. सर्वाधिक 9.9 कोटी रुपयांची रक्कम दिल्ली कॅपिटल्स संघाकडे आहे. जर कोणत्याही खेळाडूला कोणताही संघ ट्रेड करू इच्छित असेल, तर त्याला आपल्याकडील त्याच स्तरावरील खेळाडूसोबत त्याला ट्रेड करावे लागेल. तसेच, खेळाडू आणि त्याच्या संघासोबत करार केल्यानंतर रोख रक्कमेच्या बदलीही खेळाडूंची ट्रेडिंग होऊ शकते.
After some intense bidding wars, here's how the 🔟 teams look 😎
Which squad do you reckon is the strongest 🤔#IPLAuction | #IPL pic.twitter.com/iAkOgODwTw
— IndianPremierLeague (@IPL) December 20, 2023
रोहित सोडू शकतो का मुंबई इंडियन्स?
रोहित शर्मा मुंबई इंडियन्स (Rohit Sharma Mumbai Indians) संघाकडून 16 कोटी रुपये पगार घेतो. जर त्याला कोणताही संघ ट्रेड करू इच्छित असेल, तर त्याला त्याच्या रक्कमेच्या बरोबरीच्या खेळाडूला स्वॅप करावे लागेल. याव्यतिरिक्त जर संघाकडे त्याच्या स्तराच्या खेळाडूला स्वॅप करेल आणि उरलेली रक्कम रोख स्वरूपात द्यावी. फ्रँचायझी असे करू शकते. दिल्ली ही एकमेव फ्रँचायझी आहे, ज्यांच्याकडे असे करण्यासाठी रक्कम आहे. दिल्लीने लिलावात 25 खेळाडूंचा स्क्वॉड पूर्ण केल्यानंतरही 9.9 कोटी रुपये आहेत. याव्यतिरिक्त गुजरातकडे 7.85 कोटी रुपये आहेत. मात्र, त्यांना असे करायचे असते, तर हार्दिकच्या ट्रेडच्या बदली त्यांनी असे केले असते. खरं तर, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामात मुंबईचे नेतृत्व करणार आहे.
सध्या तरी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने स्पष्टपणे सांगितल आहे की, रोहित शर्मा (Rohit Sharma) फलंदाजी करेल, तो कुठेही जात नाहीये. मात्र, आगामी काळात काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ipl 2024 trading window rules will rohit sharma leaving mumbai indians know all details here)
हेही वाचा-
‘धोनी म्हटलेला, कुणीच नाही घेतले, तर त्याला आम्ही घेऊ’, 3.60 कोटींची बोली लागलेल्या खेळाडूच्या बापाचं भाष्य
IPL 2024 । 6 लाखाहून जास्त रुपयांना पडणार ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा एक चेंडू, मिचेल स्टार्क…