आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22मार्चपासून सुरवात होणार आहे. तसेच आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. त्याआधी आरसीबीला एका वेगवान गोलंदाजाची अत्यंत गरज भासणार आहे. कारण, टॉम करन बिग बॅश लीग स्पर्धेत जखमी झाल्याने आयपीएल स्पर्धेला मुकणार आहे. त्यामुळे आरसीबीबची शोधाशोध सुरू असून एक नाव अंतिम टप्प्यात आलं आहे.
याबरोबरच, आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी आरसीबीने पुन्हा एकदा कंबर कसलेली पहायला मिळत आहे. पण काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे आरसीबीचा संघ टेन्शनमध्ये आला होता. त्यामुळे या खेळाडूंसाठी पर्याय शोधण्याचं काम सुरु आहे. यासाठी आरसीबीने त्याची जागा भरून काढण्यासाठी एका वेगवान गोलंदाजाची निवड केली आहे.
फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला करारबद्ध करण्यास उत्सुक आहे. तसेच जोफ्रा आर्चरने मुंबईसोबत खेळण्याबाबत दुखापतीचे कारण दिले होते. त्यामुळे त्याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तो आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामील होऊ शकतो. अशी माहिती सध्या समोर आली आहे.
अशातच आर्चर सध्या भारतात असून बंगलोरमध्येच आहे. तसेच आर्चर सध्या त्याच्या काउंटी क्लब ससेक्ससोबत भारत दौऱ्यावर असून तो सध्या बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. तर आर्चरला या हंगामात खेळण्यासाठी आरसीबीने संपर्क केल्याची बातमी समोर आली आहे.
Jofra Archer, bowling for KSCA XI against Sussex, in a warm-up game in Bengaluru 😜pic.twitter.com/0pa2LJzVnG
— Cricbuzz (@cricbuzz) March 15, 2024
दरम्यान, टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी आर्चर ससेक्स संघासोबत भारतात आला होता. तसेच टी20 विश्वचषक जूनमध्ये होणार आहे. त्याआधी आर्चर पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी इंग्लंडची अपेक्षा आहे. तत्पूर्वी तो आयपीएल स्पर्धेत नशिब आजमावू शकतो. मात्र तो खेळणार की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.
आयपीएल 2024 साठी RCB संघ: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाक, मनोज भंडागे, मयंक डागर, विल जॅक्स, महिपाल शर्मा, लोन कर्णधार. जोसेफ, आकाश दीप, मोहम्मद सिराज, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, रीस टोपले, हिमांशू शर्मा, स्वप्नील सिंग, टॉम करन, सौरव चौहान, यश दयाल, लकी फर्ग्युसन.
महत्वाच्या बातम्या –
- मुंबईविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर स्मृती मानधना भावूक, मैदानावर अश्रू आवरले नाहीत; पाहा व्हिडिओ
- पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तिरंगी मालिकेचे आयोजन, 21 वर्षांनंतर पाकिस्तान भूषवणार यजमानपद