---Advertisement---

LSG vs KKR: लखनऊच्या विजयात निकोलस पूरनची दमदार खेळी, विरोधकांची झोप उडवली

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 21 वा सामना आज 8 एप्रिल रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. हा सामना लखनऊने चार धावांनी जिंकला. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना तीन खेळाडू गमावून 238 धावा केल्या होत्या. नंतर धावांचा पाठलाग करताना कोलकाताने 234 धावा करत 7 विकेट्स गमावल्या. लखनऊच्या विजयामध्ये आज निकोलस पुरन आणि मिशेल मार्शची कामगिरी शानदार ठरली.

लखनऊसाठी प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक धावा निकोलस पुरनने केल्या. त्याने 87 धावांची नाबाद शानदार पारी खेळली. त्यादरम्यान त्याने सात चौकार तसेच आठ षटकार झळकावले. ही पारी त्याने अवघ्या 36 चेंडूत पूर्ण केली. लखनऊच्या विजयात निकोलस पुरनने महत्त्वाची कामगिरी निभावली. मिशेल मार्शने देखील 48 चेंडूत 81 धावा केल्या. त्याने 6 चौकार तर 5 षटकार ठोकले.

धावांचा पाठलाग करताना कोलकातासाठी सर्वाधिक धावा कर्णधार अजिंक्य रहाणेने केल्या. त्याने 35 चेंडूत 61 धावा केल्या. पण आज त्याची ही शानदार पारी कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. व्यंकटेश अय्यरने सुद्धा 47 धावा केल्या. लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी आकाश दीपने 2 तसेच शार्दुल ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---