दिग्गज गोलंदाज भुवनेश्वर कुमार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला आहे. आरसीबीने आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भुवीला मूळ किमतीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त किमतीत खरेदी केले. भुवनेश्वर 10.75 कोटी रुपयांना विकला गेला आहे. तो यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता.
मुंबई इंडियन्सनं भुवनेश्वर कुमारवर पहिली बोली लावली. यानंतर लखनऊ सुपर जायंट्सही सामील झाली. मुंबईनं 10.25 कोटींची शेवटची बोली लावली. तर लखनऊनं 10.50 कोटींची बोली लावली. पण शेवटी आरसीबीनं बाजी मारली. आरसीबीनं भुवनेश्वरला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केलं. भुवीमुळे आरसीबीची गोलंदाजी खूप मजबूत झाली आहे.
भुवनेश्वर कुमार याआधी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. आतापर्यंत प्रत्येक मोसमात तो हैदराबादकडूनच खेळला आहे. 2024 मध्ये त्याला हैदराबादसाठी 4.20 कोटी रुपये मिळत होता. आता त्याचा पगार दुपटीपेक्षा अधिक वाढला आहे. भुवनेश्वर कुमारला आता 10.75 कोटी रुपये मिळणार आहेत.
भुवनेश्वरनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 176 सामने खेळले. यामध्ये त्यानं 181 विकेट्स घेतल्या आहेत. भुवीची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 19 धावांत 5 बळी. भुवनेश्वरनं दोनदा एका सामन्यात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. भुवीनं टीम इंडियासाठी 87 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावे 90 विकेट्स आहेत.
आरसीबीनं या मेगा लिलावात जोश हेजलवूडवरही खूप पैसा खर्च केला. हेजलवुड 12.50 कोटी रुपयांना विकल्या गेला आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. यष्टीरक्षक जितेश शर्माची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. आरसीबीनं त्याला 11 कोटी रुपयांना खरेदी केलं. फिलिप सॉल्ट हा देखील यष्टिरक्षक फलंदाज आहे. आरसीबीनं त्याला 11.50 कोटी रुपयांना खरेदी केलं. आरसीबीने लियाम लिव्हिंगस्टोनला 8.75 कोटी रुपयांना खरेदी केलंय.
हेही वाचा –
IPL 2025 : अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ अनसोल्ड! विल्यमसनलाही खरेदीदार मिळाला नाही
IND vs AUS: पर्थ विजयाचे एक-दोन नव्हे तर पाच शिलेदार, बुमराह-यशस्वीसह हे देखील तितकेच असरदार!
पर्थ कसोटीतील लाजिरवाण्या पराभवावर पॅट कमिन्सची प्रतिक्रिया; म्हणाला…