भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादनं 10 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. चेन्नई सुपर किंग्जपासून कोलकाता नाईट रायडर्सपर्यंत सर्वांनी शमीवर बोली लावली, पण शेवटी हैदराबादनं बाजी मारली. गुजरात टायटन्सनं शमीसाठी ‘राईट टू मॅच’ कार्ड वापरलं नाही. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरला लखनऊ सुपर जायंट्सनं 7.5 कोटी रुपयांना विकत घेतलं.
मोहम्मद शमीवर केकेआरनं पहिली बोली लावली. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जनं 8 कोटी रुपयांनंतर बोली लावली नाही. चेन्नई बाहेर पडल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सनं एंट्री केली. परंतु 9.50 कोटी रुपयांची बोली लावल्यानंतर एलएसजीनंही माघार घेतली. केकेआर अजूनही शर्यतीत होता. त्यांची शेवटची बोली 9.75 कोटी रुपये होती. पण शेवटी हैदराबादनं शमीला 10 कोटी रुपयांना विकत घेतलं. गुजरात जायंट्सला विचारण्यात आलं, पण त्यांनी शमीवर आरटीएम कार्ड खेळण्यास नकार दिला.
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू डेव्हिड मिलरची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. मिलरसाठी सुरुवातीला गुजरात आणि बंगळुरूमध्ये स्पर्धा दिसून आली. गुजरातनं 5 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. नंतर दिल्ली कॅपिटल्सनं या शर्यतीत प्रवेश केला. परंतु 7 कोटींची बोली लागेपर्यंत तेही बाहेर पडले. मिलर 7.25 कोटी रुपयांत आरसीबीत जाणार होता, तेव्हा लखनऊ सुपर जायंट्सनं 7.5 कोटी रुपयांची बोली लावून संपूर्ण खेळ बदलला.
मोहम्मद शमीवर 10 कोटी रुपये खर्च केल्यानंतर, सनरायझर्स हैदराबादकडे अद्याप 35 कोटी रुपये शिल्लक आहेत. तर दुसरीकडे, एलएसजीकडे 34.50 कोटी रुपये शिल्लक आहेत. दुखापतीमुळे शमी आयपीएल 2024 मध्ये खेळू शकला नव्हता. तर दुसरीकडे मिलरने गेल्या मोसमात 9 सामन्यात 210 धावा केल्या होत्या.
हेही वाचा –
केएल राहुलला मिळाले अवघे 14 कोटी रुपये! आरसीबी नाही तर या संघाने लावली सर्वात मोठी बोली
रिषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! अवघ्या काही मिनिटांत मोडला श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड
मेगा लिलावात अर्शदीप सिंगवर पैशांचा वर्षाव! या टीमनं लावली तब्बल 18 कोटींची बोली