आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईनं अफगाणिस्तानच्या अल्लाह गझनफरला मोठ्या रकमेत खरेदी केल, जो फक्त 18 वर्षांचा आहे. गझनफरला मुंबईनं 4.80 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती. गझनफरचा देशांतर्गत रेकॉर्ड चांगला आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलरही होता.
गझनफरवर पहिली बोली कोलकाता नाईट रायडर्सनं लावली. यानंतर आरसीबीही या शर्यतीत सामील झाली. पण आरसीबीनं शेवटची बोली 2 कोटी रुपयांपर्यंत लावली. केकेआरबद्दल बोलायचं तर, त्यांनी 4.60 कोटींची शेवटची बोली लावली. पण शेवटी मुंबईचा विजय झाला. मुंबईनं त्याला 4.80 कोटी रुपयांना खरेदी केलं.
अल्लाह गझनफरचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर आहे. मात्र व्हिसा नसल्यानं तो भारतात येऊ शकलो नाही. आता तो मुंबईच्या मुख्य संघाचा भाग असेल. गझनफर अफगाणिस्तानसाठी आतापर्यंत 8 एकदिवसीय सामने खेळला आहे. या कालावधीत त्यानं 12 विकेट्स घेतल्या. त्यानं लिस्ट ए च्या 12 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यानं 16 टी20 सामन्यात 29 विकेट्स घेतल्या.
मुंबई इंडियन्सनं वेगवान गोलंदाज दीपक चहरवर पैसे खर्च केले. मुंबईनं त्याला तब्बल 9.25 कोटी रुपयांना खरेदी केलं. चहरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्यांनी रायन रिक्लेटनला एक कोटी रुपयांना खरेदी केलं. मुंबईनं कर्ण शर्माला 50 लाखात आणि रॉबिन मिंजला 65 लाखांना खरेदी केलं. संघानं नमन धीरसाठी आरटीएमचा वापर केला. त्याला 5.25 कोटी रुपये रक्कम मिळाली आहे.
मुंबईनं सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना रिटेन केलं आहे. यामध्ये बुमराहचे मानधन सर्वाधिक आहे. त्याला 18 कोटी रुपये मिळतील. सूर्या आणि हार्दिक यांना समान वेतन मिळेल. त्यांचा पगार 16.35 कोटी रुपये आहे.
हेही वाचा –
भुवी-कोहली एकत्र खेळणार! दिग्गज गोलंदाज आरसीबीच्या ताफ्यात
IPL 2025 : अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ अनसोल्ड! विल्यमसनलाही खरेदीदार मिळाला नाही
IND vs AUS: पर्थ विजयाचे एक-दोन नव्हे तर पाच शिलेदार, बुमराह-यशस्वीसह हे देखील तितकेच असरदार!